Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeक्राईमचिंचपूर येथे दिवसाढवळ्या चोरी सोन्यासह 1 लाख 60 हजार लंपास

चिंचपूर येथे दिवसाढवळ्या चोरी सोन्यासह 1 लाख 60 हजार लंपास


आष्टी ( रिपोर्टर ):-तालुक्यातील चिंचपूर येथे दि.7 रोजी दुपारी 4 च्या दरम्यान घरातील व्यक्ती शेतात कामाला गेल्या चा फायदा घेत चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून 1 लाख 60 हजार रोकड व 1979 सालचे आईच्या लग्नातील सोने लंपास केल्याची घटना घडली आहे.

याबाबत आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चिंचपूर येथील नगर बीड रोडवर शरद रामचंद्र गोंदावले यांचे घर असून ते कामानिमित्त शेतात गेले असता याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून 1 लाख 60 हजार रोकड व त्यांची आईच्या लग्नातील दागिने चोरी गेल्याची घटना दि.7 रोजी दुपारी 4 च्या दरम्यान घडली आहे.घटनास्थळी पो.ना.रघुनाथ आटोळे,पो.उपनिरीक्षक काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला
पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काळे हे करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!