Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeक्राईमलग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीशी वारंवार शारीरिक संबंध; अट्राॅसिटी सह बलात्काराचा गुन्हा...

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीशी वारंवार शारीरिक संबंध; अट्राॅसिटी सह बलात्काराचा गुन्हा दाखल

परळी वैजनाथ, (रिपोर्टर):-

एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करुन अत्याचार व जातीवरुन शिवीगाळ, मारहाण केल्याप्रकरणी संभाजी नगर पोलीस ठाण्यात एका आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बलात्काराच्या या घटनेने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी १५ वर्षीय मुलीची आरोपी जनक यादव(पुर्ण नाव माहीत नाही) रा.दादाहरी वडगाव याच्याशी ओळख झाली. ही ओळख वाढवून त्याने जवळीक निर्माण केली. लग्नाचे आमिष दाखवून दि.२०/६/२१ रोजी परळी शहरातील एका लाॅजवर घेऊन गेला व शारीरिक संबंध प्रस्थापित केले.त्यानंतर वारंवार सलगी केली.तसेच कंडक्टर काॅलनीत स्वतंत्र रुम किरायाने घेऊन त्याठिकाणी राहायला नेऊन ठेवले.सर्व संसारोपयोगी साहित्य घेऊन देऊन पती पत्नी सारखे वेगळे ठेऊन वारंवार शारीरिक अत्याचार केले. दि.४/७/२१ रोजी त्याने येऊन जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करून तु मला लागत नाहीस असे म्हणत एकटीला सोडून निघून गेला.या आशयाची फिर्याद दिल्यावरुन आरोपी विरोधात संभाजी नगर पोलीस ठाण्यात कलम ३७६,(२)(एन),५०४,५०६,सह कलम ३१(१)(आर)(एस),३,(१),(डब्ल्यु),(१)(२), आ.जा.ज.क.२०१५ सहथ कलम४,६ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील जायभाये हे करीत आहेत.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!