Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeक्राईमवडवणीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न; सीसीटिव्ही कॅमेर्‍यात दोन चोरटे कैद

वडवणीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न; सीसीटिव्ही कॅमेर्‍यात दोन चोरटे कैद


वडवणी (रिपोर्टर):- वडवणी शहरातील चिंचवण रोडवर आसणारे एटीएम शिन फोडण्याचा प्रयत्न केला असून दोन चोरटे सीसीटिव्ही कँमेरात कैद झाले आहेत.पोलीस स्टेशनमध्ये दुपारी उशीरापर्यत कार्यवाही करण्याच्या हालचाली सुरु होत्या.


वडवणी शहरातील चिंचवण रोडवर आसणारे भारतीय स्टेट बँकेचे एटीएम कार्यरत आहे.याठिकाणी रात्री साडेआकरा वाजण्यच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन दोन चोरट्यानी तोंडाला कपडा बांधून आत प्रवेश केला व मशिनला तोडफोड करण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांना मिशन फोडता आले नसून कोणी तरी येत आहे हे लक्षात येताच सदरील चोरट्यानी पळ काढला आहे.तर चोरटे सीसीटिव्ही कँमेरेमध्ये कैद झाले आहेत.तर सदरील फुटेज पोलीसांनी ताब्यात घेतले आसल्याची माहिती मिळाली असून वडवणी पोलीस कार्यवाही करण्याच्या हलचाली करत असून दुपारी एक वाजेपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!