Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeबीडआमच्या नावाची नेहमी चर्चा होते, मी नाराज नाही, नवीन मंत्र्यांचे अभिनंदन भाजपाला...

आमच्या नावाची नेहमी चर्चा होते, मी नाराज नाही, नवीन मंत्र्यांचे अभिनंदन भाजपाला टिम देवेंद्र टिम नरेंद्र मान्य नाही -पंकजा


बीड (रिपोर्टर):- आम्ही लोकांमध्ये काम करतो. मी आणि माझ्या कुटुंबाने पक्षाला आयुष्य दिलं आहे. त्यामुळे आमच्या नावाची नेहमी चर्चा होते. प्रितम यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी नाराज नाही. नवीन मंत्र्यांना फोन करून अभिनंदन केलं आहे, असे म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी अखेर आज मौन सोडलं. भाजपाला टिम देवेंद्र टिम नरेंद्र मान्य नसल्याचे सांगून भाजप एकसंघ आहे. भाजपाला मला संपवायचे आहे, असे मला तिळमात्र वाटत नसून वंजारा समाजातून कोणी नेता पुढे जात असेल तर मी त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहील, असे पंकजा मुंडेंनी म्हटले.


केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. आज अखेर पंकजा मुंडेंनी मौन सोडत मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या वेळी पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, प्रितम मुंडेंना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराज नाही. मंत्रिपद मिळालेल्या सर्वांना मी फोन करून अभिनंदन केलं आहे. पक्षाने घेतलेला निर्णय योग्य असून तो मला मान्य आहे. पक्षाने नवीन लोकांना संधी दिली आहे. त्यातून पक्षाचे मत वाढले तर मला अधिक आनंद होईल. प्रितम मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या आहेत, पक्षासाठी त्या मेहनत घेत आहेत. सुशिक्षित आहेत म्हणून त्यांच्या नावाची चर्चा होते. भाजपाला मला संपवायचं आहे, असं मला वाटत नाही. राजकारणात मी व्यवसाय म्हणून नाही तर व्रत म्हणून आलेले आहे. वंजारा समाजातून कोणी पुढे नेता म्हणून जात असेल तर त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहील. फक्त पंकजा, प्रितम म्हणजे वंजारा समाज नाही, असे म्हणत भाजपाला टिम देवेंद्र टिम नरेंद्र मान्य नाही. हा एकसंघ पक्ष आहे. मी नेतृत्व नाही तर कार्यकर्ता असल्याचे सांगत स्व. गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींनी पंकजा मुंडे या वेळी भावूक झाल्या. पंकजा आणि प्रितम यांनी कधीच मंत्रिपदाची मागणी कोणाकडेही केलेली नव्हती. मी आणि माझ्या कुटुंबाने पक्षाला आयुष्य दिले आहे. मी आश्रित नाही म्हणून पुनर्वसनाचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगून आम्ही लोकांमध्ये आहोत, लोकांमध्ये काम करत आहोत. काही वेळा कटुता येऊ शकते परंतु नातं कधी तुटू शकत नाही. लोकात असल्यामुळे कार्यकर्त्यात काहीशी नाराजगी असणे साहजिक आहे. परंतु आम्ही नाराज नाहीत. ओबीसीच्या प्रश्नावरून पंकजा म्हणाल्या, जोपर्यंत राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नेत, असंही त्यांनी या वेळी म्हटलं.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!