Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeदेश विदेशबोंबला! ‘अच्छे दिन’ची हमी देणार्‍या मोदी मंत्रिमंडळाची गुन्हेगारी पार्श्वभूमी

बोंबला! ‘अच्छे दिन’ची हमी देणार्‍या मोदी मंत्रिमंडळाची गुन्हेगारी पार्श्वभूमी

केंद्रीय गृह राज्यमंत्र्यावरच खुनाचा गुन्हा
42 टक्के मंत्री गुन्हे प्रवृत्तीचे
33 मंत्र्यांवर गुन्हे दाखल तर 24 मंत्र्यांविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोड्यासारखे गंभीर गुन्हे


दिल्ली (रिपोर्टर):- स्वच्छ प्रशासन आणि अच्छे दिनची हमी देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार दोन दिवसांपुर्वी पार पडला. या विस्तारानंतर मोदी सरकारचे जम्बो मंत्रिमंडळ तयार झाले असून मंत्र्यांची संख्याही 78 वर गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील 42 टक्के मंत्री हे गुन्हेगारी स्वरुपाचे असून 33 मंत्र्यांविरोधोत गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात 24 जणांविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोड्याचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे नुकतेच या संदर्भात जाहीर झालेल्या अहवालातून दिसून येते. सदरच्या अहवालात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळा संबंधित माहिती देण्यात आली. त्यात सर्व बाबी उघड झाली आहे. देशाच्या नव्या गृहमंत्र्याविरोधातही खुनाचा आणि हत्येचा प्रयत्नचा गंभीर गुन्हा दाखल आहे.


भ्रष्टाचारमुक्त भारत, स्वच्छ प्रशासन, अच्छे दिन याची भाषा बोलत हमी देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंत्रीमंडळ गुन्हेगारी स्वरुपाचे असल्याचे आता समोर आले आहे. निवडणुक प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेल्या माहितीत असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) कडून याचा अभ्यास अहवाल प्रकाशीत केला जातो. एडीआरच्या ताज्या अहवालानुसार मोदी सरकारच्या जम्बो 78 मंत्रिमंडळातील 33 मंत्र्यांची गुन्हेगारी पार्श्भूमी आहे. त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. याशिवाय 24 मंत्र्यांविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या सर्वांनी निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रामध्ये दिलेल्या माहितीवरून हा निष्कर्ष समोर आला आहे. यंदाच्या मंत्रिमंडळात सर्वात तरुण मंत्री ठरलेले 35 वर्षीय निषित प्रमाणिक यांच्याकडे केंद्रिय गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ज्या व्यक्तीकडे देशाचं गृहखातं देण्यात आला आहे. त्यांच्याच विरोधात भारतीय दंड विधानच्या कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल असल्याचे एडीआरच्णया अहवालात नमूद करण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकी दरम्यान ज्या कुच बिहारमध्ये हिंसक घटना घडल्या होत्या त्या मतदारसंघातून निषित प्रमाणिक हे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. याशिवाय जॉन बारला, पंकज चौधरी आणि व्ही. मुरलीधरन या तिघांविरोधात हत्येचा प्रयत्न कलम 307 नुसार गुन्हा दाखल आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातील 90 टक्के मंत्री हे करोडपती असून या मंत्र्यांची प्रत्येकी संपत्ती ही 16.24 कोटी आहे. केंद्रातल्या एकूण 4 मंत्र्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात 50 कोटींहून अधिक संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे, पियुष गोयल, नारायण राणे आणि राजीव चंद्रशेखर यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील गुन्हे पार्श्वभूमीच्या मंत्र्यांचा समावेश हा देशात चर्चेचा विषय बनला आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!