Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeबीडराजीनामे बीडमध्ये, पंकजा दिल्लीत; राजीनाम्याचे लोण नगर जिल्ह्यापर्यंत, पंकजा मुंडे भाजप राष्ट्र...

राजीनामे बीडमध्ये, पंकजा दिल्लीत; राजीनाम्याचे लोण नगर जिल्ह्यापर्यंत, पंकजा मुंडे भाजप राष्ट्र अध्यक्षांची भेट घेणार


भेटीकडे राज्याचे लक्ष, मुंबईत समर्थक पदाधिकार्‍यांची बैठक

दिल्ली/बीड (रिपोर्टर):- केंद्रिय मंत्रिमंडळाच्या विस्तारात बीडच्या खासदार प्रितम मुंडे यांना डावलण्यात आल्याचे पडसाद बीड जिल्ह्यात उमटताना दिसून येत असून आतापर्यंत 51 भाजपा पदाधिकार्‍यांनी राजीनामे दिल्यानंतर त्याचे लोण आता थेट नगरपर्यंत पोहचले आहे. त्याठिकाणीही राजीनामा सत्र सुरु झाला आहे. दुसरीकडे आज सकाळी पंकजा मुंडे या दिल्लीत डेरेदाखल झाले आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची त्या भेट घेणार आहेत. या भेटीत नेमके काय घडते याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. दरम्यान मंगळवारी पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थक पदाधिकार्‍यांची मुंबईत बैठक बोलावली आहे.


दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन पंकजा मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचे सांगत भाजपात देवेंद्र टिम-नरेंद्र टिम नसल्याचे सांगून भाजप हा सर्वप्रथम राष्ट्राला नंतर पक्षाला आणि नंतर व्यक्तीला महत्व देतो, इथे मी पणाला प्राधान्य नाही, असे म्हटले होते. मात्र त्यानंतर दुसर्‍याच दिवशी बीड जिल्ह्यात मुंडे समर्थकांनी आणि भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी राजीनाम्याचं अस्त्र उगारलं. बीडमध्ये आतापर्यंत 51 पेक्षा जास्त पदाधिकार्‍यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. तिकडे राजीनाम्याचें लोण हे नगर जिल्ह्यापर्यंत जाऊन पोहचले. त्याठिकाणी सभापती आणि भाजपाच्या उपाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे तर आज सकाळी पंकजा मुंडे या दिल्लीत डेरेदाखल झाल्याने भाजपाच्या राजकीय गोटात काय खलबते शिजतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पंकजा मुंडे भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेणार असून या भेटीकडे प्रितम मुंडे यांना डावलण्यात आलेला विषय आणि त्यानंतर उमटत असलेले पडसाद यावर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. या भेटीत पंकजा मुंडे काय भूमिका घेतात आणि पक्ष काय भूमिका घेतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!