Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeक्राईमसायलीच्या मृत्यूचे गूढ कायम.....?

सायलीच्या मृत्यूचे गूढ कायम…..?

गेवराई (रिपोर्टर) : इयत्ता दहावीच्या परीक्षेत 98 % गुण मिळवून गुणवत्ता यादीत आलेल्या सायलीने आत्महत्ये सारखे एवढे टोकाचे पाऊल का उचलले, असा यक्ष प्रश्न नागरीकांना पडला असून, या प्रकरणाचे गुढ वाढले आहे. घरातून निघून गेल्यावर तिची कुणाशी तरी भेट झाली होती का, मोंढा चौकातल्या सीसीटीव्हीत या बाबत काही नोंदी आढळून येतात की नाही, या दिशेने तपास होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलीस तपास सुरू असून, मुलीच्या वडीलांनी मिसिंग तक्रारीत संशय व्यक्त केला होता.

दरम्यान, सदरील मुलीचा मृत्यू पाण्यात बुडल्याने झाल्याचा प्राथमिक अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्याने दिला आहे. सोमवार दि.16 रोजी पहाटे घरातून निघून गेलेल्या सायली पारेकर या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह शहरापासून जवळच असलेल्या गोविंदवाडी शिवारतील एका विहिरीत बुधवार दि. 18 रोजी सकाळी आढळून आला होता. जिल्हा परिषदचे शिक्षक कल्याण पारेकर यांची मुलगी कु. सायली कल्याण पारेकर ( वय वर्ष 17 ) रा.  गणेश नगर, गेवराई येथून सोमवार दि.16 रोजी रात्री घरातून निघून गेली होती. सायलीने मी मरतीय, माझा शोध घेऊ नका व कोणालाच जबाबदार धरू नका, अशी नोट लिहून ठेवली होती. तिच्या वडलांनी तातडीने मुलीचा शोध घेण्याचे आवाहन केले होते. मंगळवार दि. 17 रोजी पोलीसात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीत तिला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला होता. बुधवार दि.18 रोजी पहाटे वाॅकिंग जाणाऱ्यांना तिचा मृतदेह शहरापासून जवळच असलेल्या गोविंदवाडी शिवारतील एका विहिरीत तरंगतांना आढळून आला होता. सायली औरंगाबाद येथील एका खाजगी क्लासला होती. लाॅकडाऊन मुळे ती घरी आली होती. दहावीला तिला 98% मार्क मिळाले होते. मेडिकल क्षेत्रात तिला करीयर करायचे होते. त्या आधीच तिने स्वतःला संपवल्याने तिचे स्वप्न अधुरेच राहीले. घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, सायली घरातून निघून शहरातील मोंढ्यात मौलाना आझाद चौकात दीड वाजण्याच्या सुमारास थांबली होती. त्याच वेळी दुचाकीवरून कोणीतरी तिथे आले होते. तिच्याशी चर्चा करून ते निघून गेल्याची शहरात चर्चा आहे. त्यामुळे, या प्रकरणाचे गुढ वाढले आहे.इयत्ता दहावीच्या परीक्षेत 98 % गुण मिळवून गुणवत्ता यादीत आलेल्या सायलीने आत्महत्ये सारखे एवढे टोकाचे पाऊल का उचलले, असा यक्ष प्रश्न नागरीकांना पडला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गुढ वाढले आहे. घरातून निघून गेल्यावर तिची कुणाशी भेट झाली होती का, मोंढा चौकातल्या सीसीटीव्हीत या बाबत काही नोंदी आढळून येतात का, या दिशेने तपास होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  पोलीस तपास सुरू असून, मुलीच्या वडीलांनी मिसिंग तक्रारीत संशय व्यक्त केला होता. त्या तक्रारी वरून अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.दरम्यान, सदरील मुलीचा मृत्यू पाण्यात बुडल्याने झाल्याचा प्राथमिक अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्याने दिला आहे. Attachments area

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!