Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeबीडअतिवृष्टीच्या नुकसानीसाठी शेतकरी प्रतीक्षेत

अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी शेतकरी प्रतीक्षेत


बीड (रिपोर्टर)- बीड जिल्हा प्रशासनाला अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले अशा शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी मदतीचा पहिला हप्ता म्हणून 153 कोटी 79 लाख रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले तरी अद्यापपर्यंत तलाठ्यांकडून याद्या अद्यावत न झाल्यामुळे शेतकर्‍यांच्या खात्यावर ही मदत पोहचू शकली नाही.
दिवाळीपूर्वी या शेतकर्‍यांना त्यांच्या खात्यावर नुकसानीची रक्कम जमा करण्यात येईल, असे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात होते. त्याप्रमाणे बीड जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या मदतीसाठी तीनशे कोटी रुपये लागणार असल्याचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविल्यानंतर ऐन दिवाळीच्या दोन दिवसापूर्वी जिल्हा प्रशासनाला या तिनशे कोटी पैकी 153 कोटी 79 लाख रुपये प्राप्तही झाले. जिल्हाधिकारी रेखावार यांनी आपली सर्व यंत्रणा कामाला लावत जिल्ह्यातील अकरा तालुक्यांना नुकसानीच्या टक्केवारीनुसार प्रत्येक तालुक्याला रक्कमही वितरीत केली. मात्र दिवाळीच्या दोन महिन्याअगोदर तलाठ्यांनी त्यांना मिळालेल्या सूचनेप्रमाणे हेक्टरी 6 हजार 800 प्रमाणे शेतकर्‍यांच्या याद्या तयार करण्यात आल्या मात्र शेतकर्‍यांना हेक्टरी 10 हजार रुपये मदत देण्याचे शासनाने आदेश काढल्याने पुन्हा ह्या याद्या दुरुस्त करून तलाठ्यांनी दुरुस्त करून तहसीलला सादर कराव्यात, असे आदेश दिल्याने तहसीलदारांच्या खात्यावर रक्कम जमा असतानाही ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर अद्यापपर्यंत जमा करण्यात आलेली नाही. त्यामुळे अद्यापपर्यंत तरी जिल्ह्यातील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!