Saturday, November 27, 2021
No menu items!
HomeUncategorizedपाडळसिंगी- कुकडगाव ,वडगाव गुंधा, पिंपळनेर वडवणी ते लोखंडी सावरगाव 84 किलोमीटर राज्य...

पाडळसिंगी- कुकडगाव ,वडगाव गुंधा, पिंपळनेर वडवणी ते लोखंडी सावरगाव 84 किलोमीटर राज्य मार्गाला 425 कोटींचानिधी मंजूर ; आ.पवारांच्या प्रयत्नाला यश


गेवराई (रिपोर्टर): दळणवणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या व गेवराई मतदारसंघातून जाणार्‍या पाडळसिंगी- कुकडगाव ,वडगाव गुंधा, पिंपळनेर, वडवणी ते लोखंडी सावरगाव, या राज्य मार्गाच्या ( क्रमांक 232 ) 84 किलोमीटर रस्त्याला मंजूरी मिळाली असून, सदरील प्रकल्प एशियन डेव्हलपमेंट बँके (एडीबी) मार्फत होणार आहे. त्यामूळे दरम्यान ,या रस्त्यासाठी 425 कोटी रूपये मंजुर झाल्याचे उस्मानाबाद येथील विभागीय कार्यालयाने यांनी कळविले आहे. विशेष बाब म्हणजे, या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी आमदार लक्ष्मण पवार यांनी प्रयत्न केले आहेत.
गेवराई मतदारसंघात नागरीकांच्या दळणवळणच्या सोयीसाठी आमदार पवार यांनी गेल्या काही वर्षांपासून विशेष लक्ष देऊन, रस्ता विकासाला चालना दिली आहे. न्वेटी अंतर्गत सुरू असलेल्या 167 कोटी रुपयाच्या बागपिंपळगाव ते तलवडा – टाकरवण राज्य रस्ता प्रगतीपथावर आहे. त्याच बरोबर, श्रीक्षेञ राक्षसभुवन येथील 21 कोटी रुपयांचा दर्जेदार सिमेंट रस्ता पूर्ण झाला असून, महाराष्ट्र राज्य रस्ता विकास प्रकल्पाच्या अंतर्गत संबंधीत एजन्सी, या रस्ताचे काय करणार आहे. सदरील कामाचा डिपीआर तयार करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, आमदार लक्ष्मण पवार यांनी विशेष परिश्रम घेऊन शासनाकडे पाठपुरावा केला होता. सदरील प्रकल्पाला शासनाने मजुरी दिली असून, हा रस्ता डळसिंगी- कुकडगाव ,वडगाव गुंधा, पिंपळनेर , वडवणी ते लोखंडी सावरगाव पर्यंत करण्यात येणार आहे. या राज्य मार्गाच्या ( क्रमांक 232 ) 84 किलोमीटर रस्त्याला मंजूरी मिळाली असून, सदरील प्रकल्प एशियन डेव्हलपमेंट बँके (एडीबी) मार्फत होणार असल्याचे उस्मानाबाद येथील विभागीय कार्यालयाने कळविले आहे. आमदार लक्ष्मण अण्णा पवार , राज्य रस्ता बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित एजन्सीने या मार्गाची पहाणी केली आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!