निवडणुकीचे बिगूल लवकरच वाजणार
किल्लेधारूर (रिपोर्टर) धारूर नगरपरीषद निवडणूकीत दहा प्रभागाचे विस जागाचे आरक्षण आज 13 जुन रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमूख, मुख्याधीकारी विशाल पाटील यांच्या उपस्थितीत काढण्यात आले आहे. शालेय विद्यार्थिनी बांगर हिच्या हस्ते चिठ्ठ्या टाकून काढण्यात आले यामध्ये सर्व प्रभाग 10 मधील अ जागेसाठी महिला असणार आहेत तर प्रभाग क्रमांक दोन व दहा यामधील महिला ह्या अनुसूचित जाती प्रवर्गातील असणार आहेत तसेच प्रभाग क्रमांक 9 मधील व अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव राहिलेला आहे.
दहा प्रभागातील वीस जागांचे आरक्षण पुढील प्रमाणे आहे त्यात प्रभाग क्रमांक 1 अ) खुला प्रवर्ग महीला ब) सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक 2 अ) अनुसूचित जाती महीला एस सी (ब) सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 3 अ) खुला प्रवर्ग महिला (ब) सर्वसाधारण प्रभाग 4 अ) खुला प्रवर्ग महीला ब) सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 5 अ) खुला प्रवर्ग महीला (ब) सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 6 अ) खुला प्रवर्ग महिला ब ) सर्वसाधारण प्रभाग 7 अ) खुला प्रवर्ग महिला ब) सर्वसाधारण . प्रभाग क्रमांक 8 अ) खुला प्रवर्ग महिला (ब) सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 9 अ) खुला प्रवर्ग महिला ब) अनुसूचित जाती प्रवर्ग प्रभाग क्रमांक 10 अ) अनुसूचित जाती महिला प्रवर्ग ब) सर्वसाधारण अशाप्रकारे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आरक्षण हे चिठ्ठ्या टाकून लहान मुलींच्या हस्ते काढण्यात आले यावेळी धारूर नगर परिषदेचे कर्मचारी सचिन डावकर, माणिक लोखंडे, अरुण वाघमारे, शेख अब्बास, माणिक गायसामुद्रे, कराड, किरण नेहरकर इत्यादि उपस्थित होते.