Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeदेश विदेशशरद पवार यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, फडणवीसही दिल्लीत

शरद पवार यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, फडणवीसही दिल्लीत


नवी दिल्ली (वृत्तसेवा):- शनिवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलीय. ही भेट चर्चेत न आली तरच नवल… उल्लेखनीय म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी शरद पवार यांच्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर काल (१६ जुलै) शरद पवार यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती.

आगामी संसदेच्या पावसाळी अधिवेशना अगोदर मोदी – पवार भेटीसंदर्भात वेगवेगळा कयास लावला जातोय. दरम्यान लोकसभेची सभापती ओम बिर्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेचं पावसाळी अधिवेश येत्या १९ जुलै ते १३ ऑगस्टपर्यंत पार पडणार आहे. यामध्ये १९ दिवस कामकाज पार पडेल. दुसरीकडे, महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही ठिकठाक नसल्याच्या चर्चा सुरू असताना शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट महत्त्वाची ठरतेय. दिल्लीकडे रवाना होण्यापूर्वी शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांत जवळपास ३० मिनिटांची चर्चा झाली. इतकंच नाही तर सध्या विरोधी देवेंद्र फडणवीस हेदेखील दिल्लीत दाखल झालेले आहेत. गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनीही दिल्ली गाठल्यानं राज्यातील राजकारणही वेगळं वळण घेणार का? याकडे अनेकांचं लक्ष आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!