Friday, August 6, 2021
No menu items!
Homeदेश विदेशदेशातील कोरोना महामारी संपुष्टात येऊ दे, जम्मु-काश्मिरात रजनीताईताई पाटलांचे हजरतबल दर्गाहला साकडे

देशातील कोरोना महामारी संपुष्टात येऊ दे, जम्मु-काश्मिरात रजनीताईताई पाटलांचे हजरतबल दर्गाहला साकडे

बीड (रिपोर्टर):- माजी खासदार तथा काँग्रेसच्या जम्मू-काश्मिगर प्रभारी रजनीताई पाटील यांनी श्रीनगर स्थित सुप्रसिद्ध हजरतबल दर्गाह या ठिकाणी जावून नतमस्तक होत कोरोना महामारी संपुष्टात यावी याबाबत साकडे घातले. या वेळी रजनाताई पाटील यांनी काँग्रेससाठी देशातला प्रत्येक नागरीक, प्रत्येक धर्म हा सर्वपरी असल्याचे सांगून भारताला प्रगतीपथावर नेण्याचा सिद्धांत काँग्रेसचा असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसच्या जम्मू-काश्मिर प्रभारी तथा बीड जिल्ह्याच्या माजी खासदार रजनीताई पाटील यांनी आज सकाळी ट्विटद्वारे श्रीनगरस्थित सुप्रसिद्ध हजरतबल दर्गाह या ठिकाणी माथा टेकवल्याचे ट्विट केले.

1a

बीडच्या माजी खा. रजनीताई यांच्यावर काँग्रेस पक्ष आजपर्यंत अनेक जबाबदार टाकत आला आहे. आता त्यांनी रजनीताई यांच्यावर जम्मु-काश्मिगरच्या प्रभारी पदाची जबाबदारी टाकलेली आहे. तेव्हापासून ताई सातत्याने जम्मु काश्मिर भागात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतात. ाज त्यांनी हजरतबल दर्गाह या ठिकाणी जावून अत्यंत मनोभावाने दर्शन घेतले. या वेळी त्यांनी देशातीलच नव्हे तर या संसारातील महामारी संपुष्टात यावी, अशी श्रध्दापुर्वक कामना करत काँग्रेससाठी देशातला प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक धर्म हा सर्वपरी आहे, असे सांगून सर्वांनी एकजुटीने रहावे आणि भारताला प्रगीी पथावर घेऊन जावे, हाच काँग्रेसचा सिद्धांत असल्याचे म्हटले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!