Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeक्राईममुलीचा विनयभंग करणार्‍या आरोपीला पिंपळनेर पोलिसांचे अभय

मुलीचा विनयभंग करणार्‍या आरोपीला पिंपळनेर पोलिसांचे अभय


आरोपीच्या अटकेसाठी आई-वडिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

बीड (रिपोर्टर):- पिंपळनेर येथील एका सतरा वर्षीय मुलीचा गावातीलच तरुणाने विनयभंग करून फिर्यादीला धमकी दिल्याची घटना 26 जून रोजी घडली होती. या प्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलीसांनी अद्यापही आरोपीला अटक केली नाही. आरोपी हा फिर्यादीच्या घरी जावून त्यांना गुन्हा मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत आहे. मात्र या प्रकरणी फिर्यादीने पिंपळनेर पोलिसांना तक्रार दिली असली तरी पोलीस याची दखल घेत नसल्याने मुलीच्या आई-वडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.


पिंपळनेर येथील एका 17 वर्षीय मुलीची छेडछाड करून माझ्यासोबत लग्न कर, आपण दोघे पळून जावू, असे म्हणून कृष्णा अरुण बर्डे हा त्या मुलीस त्रास देत होता. 26 जून रोजी मुलगी पाणी आणण्यासाठी गेली असता आरोपीने तिची छेड काढली. या प्रकणी मुलीच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपीला अद्याप अटक केलेली नाही. आरोपी गुन्हा मागे घेण्यासाठी फिर्यादींना धमकावत असून पिंपळनेर पोलीस आमचे काहीच वाकडे करू शकत नाही तुम्ही गुन्हा मागे घ्या असे म्हणून त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. याबाबत त्यांनी पिंपळनेर पोलीसांना तक्रार दिली तरी त्याची दखल घेतली नाही त्यामुळे आरोपीला अटक करण्यासाठी पीडितेच्या आई-वडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!