Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeबीडहरिनामाच्या गजरात माऊलींच्या चलपादुका पंढरपूरकडे मार्गस्थ

हरिनामाच्या गजरात माऊलींच्या चलपादुका पंढरपूरकडे मार्गस्थ

पंढरपूर (रिपोर्टर):-पंढरपूरच्या सावळ्या विठू रायच्या ओढीने परंपरेने पंढरपूरला जाण्यार्‍या संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या चलपादुका यंदाही कोरोनामुळे पा मोजक्याच लोकांच्या उपस्थित शिवशाही एस.टी.बसने आळंदीतून पंढरपूरला मार्गस्थ झाल्या.सतरा दिवसांचा आजोळघरातील मुक्काम हलवून सोमवारी (दि.19) रोजी सकाळी नऊच्या सुमारास चलपादुका मार्गस्थ झाल्या.

पिहाटे पवमान अभिषेक,सकाळी आठ वाजता कीर्तन पार पडले त्यानंतर पादुका पूजन व आरती संपन्न झाली. माऊलींना नैवेद्य दाखवण्यात आला. कर्णा झाल्यानंतर माऊलींच्या पादुका हरिनामाचा गजरात पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांनी राजेंद्र आरफळकर यांच्याकडे सुपूर्द केल्या. त्यांनी एस.टी.बस पर्यंत चालत जात पादुका मोजक्या चाळीस लोकांच्या समवेत हरिनाम, टाळ-मृदुंगाच्या गजरात गजरात एस.टी. महामंडळाच्या शिवशाही एस.टी.बसमध्ये विराजमान केल्या. बिस वर भाविकांनी पुष्पवृष्टी केली.बस पंढरीच्या दिशेने रवाना झाली यावेळी माऊली – माऊलींच्या गजराने यावेळी परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी अंकुश जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर साबळे, पालखी सोहळा प्रमुख ड विकास ढगे-पाटील, विश्‍वस्त अभय टिळक, लक्ष्मीकांत देशमुख, सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, राजाभाऊ चोपदार, माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील, अशोकराव कांबळे, राहुल चिताळकर, अजित वडगावकर व मानकरी, वारकरी, भाविक उपस्थित होते.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!