Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeबीडगेवराईमहसूल विभागाचा गोदावरी पात्रात छापा अवैध वाळूचे 17 हायवा पकडले; तहसीलदार...

महसूल विभागाचा गोदावरी पात्रात छापा अवैध वाळूचे 17 हायवा पकडले; तहसीलदार सचीन खाडे यांची कारवाई


5 कोटींचा मुद्देमाल जप्त; वाळु माफियात खळबळ, गोदावरी पात्रात पळापळ, काही हायवा चिखलात
फसले तर काहींनी गाड्या पळविल्या

भागवत जाधव । गेवराई
गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळुचा उपसा सुरुच आहे. हायवाद्वारे वाळू उपसा करण्यास बंदी असतानाही नियम धाब्यावर बसवून काही वाळू माफिया रात्रीच्या दरम्यान वाळुची वाहतूक करत आहे. राक्षसभुवन शिवारातून मोठ्या प्रमाणात वाळुचा उपसा होत असल्याची गुप्त माहिती तहसीलदार सचीन खाडे यांना झाल्यानंतर आज पहाटे महसूल विभागाने सदरील ठिकाणी छापा मारून 17 हायवा पकडले. या कारवाईमुळे वाळु माफियात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळुचा उपसा सुरुच आहे. वाळु माफियांविरोधात कठोर कारवाई केली जात नसल्यामुळे वाळुचा उपसा होत आहे. राक्षसभुवन शिवारातून रात्रीच्या दरम्यान वाळुचा उपसा होत असल्याची गुप्त माहिती तहसीलदार सचीन खाडे यांना झाल्यानंतर त्यांनी आज पहाटे घटनास्थळी छापा टाकला. या वेळी 16 हायवा घटनास्थळी आढळून आले. तहसीलदारांनी छापा टाकल्यानंतर नदीपात्रात एकच खळबळ उडाली. काही हायवा चालकांनी गाड्या पळवून नेण्याचा प्रयत्न केला मात्र पाऊस पडल्याने सर्वत्र चिखल झालेला आहे. चिखलात काही गाड्या फसल्या होत्या. एकूण 16 गाड्या महसूल विभागाला सापडल्या. यात काही ब्रास वाळुही होती. एकूण 5 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई तहसीलदार सचीन खाडे, पोलीस उपनिरीक्षक झिंजुर्डे, मंडल अकिारी पखाले, लेंडाळ, अंगद काशीद, कुरळकर, कुलकर्णी मॅडम, शेख जावेद, तलाठी पांढरे, डोपे, देशमुख, सुपेकर, ढाकणे, कोतवाल काळे, बेलुर, गिरी, चव्हाण यांनी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सर्व हायवा गेवराई पोलिस ठाण्यात आणण्यात आल्या. यातील काही गाड्या नगरच्या तर काही गाड्या बीड जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येते. या कारवाईमुळे वाळू माफियात एकच खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!