Friday, August 6, 2021
No menu items!
Homeआरोग्य & फिटनेसजिल्हा आरोग्य अधिकारी पवार यांची सातारा येथे बदली

जिल्हा आरोग्य अधिकारी पवार यांची सातारा येथे बदली


बीड (रिपोर्टर):- कोरोनाच्या काळामध्ये जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणारे जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिसन पवार यांची सातारा येथे नुकतीच बदली झाली असून बीड येथे मात्र अद्याप कुणाची पदस्थापना केलेली नाही. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेमध्ये ग्रामीण भागातील संसर्ग रोखण्यासाठी महत्वपुर्ण आरोग्य यंत्रणा उभारण्याचे काम पवार यांनी केले होते.
तब्बल साडेतीन वर्षापासून पवार हे बीड येथे कार्यरत होते. त्यामुळे लॉंगस्टेच्या नावाखाली आरोग्य प्रशासनाने त्यांची त्याच पदावर सातारा येथे बदली केली. बदलीच्या दिवशीही चिंचाळा येथे अतिसाराची जी साथ पसरली आहे ती साथ आटोक्यात आणण्यासाठी काल आणि आज त्यांनी चिंचाळा या ठिकाणी भेट देऊन कुप्पा येथील आरोग्य यंत्रणा कामाला लावली. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत जिल्ह्यात येणार्‍या नागरिकांचे विलगीकरण करणे, ग्रामीण भागात कोरोना पसरू नये याचे उत्कृष्ट नियोजन पवार यांनी आपल्या कार्यकाळात केले होते.

Most Popular

error: Content is protected !!