Friday, August 6, 2021
No menu items!
Homeकोरोनाआष्टी,बीड,गेवराई, पाटोद्यात संसर्ग वाढला जिल्ह्यात 238 पॉझिटिव्ह

आष्टी,बीड,गेवराई, पाटोद्यात संसर्ग वाढला जिल्ह्यात 238 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):- राज्यात तिसर्‍या लाटेची भिती व्यक्त केली जात असतांना बीडमध्ये ग्रामीण भागात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आज आलेल्या अहवालात आष्टी, बीड, गेवराई, पाटोद्यात मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून आल्याने जिल्ह्याचा आकडा 238 वर जावून पोहचला आहे.


आरोग्य विभागाला आज 5 हजार 374 संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 5 हजार 136 जण निगेटीव्ह आढळून आले तर 238 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई 11, आष्टी 57, बीड 37, धारूर 13, गेवराई 33, केज 14, माजलगाव 7, पाटोदा 36, शिरूर 21 आणि वडवणी तालुक्यात 9 रूग्ण आढळून आले आहेत. सध्या जिल्ह्यात लॉकडाऊन शिथील असल्याने नागरीक खरेदीसाठी दुकानात गर्दी करत आहेत. मात्र अशा वेळी कुठलेच कोरोनाचे नियम पाळले जात नाही. अनेक जण मास्कचा वापर करत नाहीत. लॉकडाऊन लादल्यानंतर मात्र नियमाचे पालन काटेकोरपणे प्रशासन करून घेत आहे. खर्‍या अर्थाने आता सक्ती करून नियमाचे पालन करणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!