Thursday, December 3, 2020
No menu items!
Home बीड गेवराई तहसीलदारांच्या पथकावर वाळू माफियांचा हल्ला,चार कर्मचारी जखमी

तहसीलदारांच्या पथकावर वाळू माफियांचा हल्ला,चार कर्मचारी जखमी

; बोरगाव बुद्रुक शिवारात घडली घटना
जिल्हाधिकार्‍यांनी दिली आज सकाळी भेट
गेवराई (रिपोर्टर)- गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी पात्राच्या हद्दीत अनाधिकृत वाळुचा उपसा सुरुच आहे. हा वाळु उपसा रोखण्यास महसूल आणि पोलिस प्रशासन अपयशी ठरत आहे. बोरगाव बुद्रुक शिवारात चोरट्या पद्धतीने वाळू उपसली जात असल्याची माहिती तहसीलदार यांना झाल्यानंतर तहसीलदाराच्या पथकाने त्या ठिकाणी जावून एका टिप्पर चालकास विचारपूस केली असता गाडीमध्ये आलेल्या काही लोकांनी पथकावर हल्ला केला. यात चार कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आज घटनास्थळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार भेट देणार असल्याचे सांगण्यात आले. या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली.
चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बोरगाव बुद्रुक शिवारातून अनाधिकृतपणे वाळुचा उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार खाडे यांना झाल्यानंतर ते व त्यांचे सहकारी मंडल अधिकारी अमोल कुरुळकर, तलाठी राजकुमार धारूरकर, कोतवाल योगेश शहाणे, शिवशंकर आतकरे, दीपक राठोड हे दाखल झाले. बोरगाव ते कुरणपिंप्री रस्त्यावर या पथकाला पांढर्‍या रंगाचा टिप्पर आढळून आला. या टिप्परला थांबवून त्यांनी चालकाशी विचारपूस केली तितक्यात पाठीमागून एक लाल रंगाची गाडी आली, जिचा क्र. एम.एच. 16 डी.झेड. 9701 असा होता. यातील लोकांनी पथकातील कर्मचार्‍यांना काठीने मारहाण केली. यामध्ये संजय शंकर नेवडे (वय 41), योगेश सुरेश शहाणे (वय 24), शिवशंकर सुरेश आतकरे (वय 26) आणि दिपक आसाराम राठोड (वय 37) यांना मारहाण केली. या मारहाणीत हे चौघे जण जखमी झाले असून या प्रकरणी संजय नेवडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरोधात चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती आज जिल्हाधिकारी राहूल रेखावार घटनास्थळी भेट देणार असल्याचे सांगण्यात आले.

Most Popular

बिबट्या बीडच्या सीमेवर, चर्‍हाट्याजवळ महिलेवर हल्ला

बीड (रिपोर्टर)- आष्टी तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या पकडण्यात अद्याप वनविभागाला यश आले नसतानाच बीडच्या सीमेलगत चर्‍हाट्याजवळ एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची...

माजी मंत्री पंकजा मुंडेंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

बीड (रिपोर्टर)- मला सर्दी खोकला आणि ताप असल्याने मी जबाबदारी स्वीकारून स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे, अशी माहिती भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी...

गावागावात नरभक्षी सन्नाटा अफवामुळे संभ्रम

किन्ही गावातील काही रहिवाशांचे पलायन, लहान मुलांनी स्वत:ला कोंडून घेतले; सायंकाळी पाच नंतर घराची दारे बंद करून घेतात ग्रामस्थसंपुर्ण रात्र जीव मुठीत...

पिंपळनेर येथील जेष्ठ स्वतंत्र सैनिक किसनराव नरवडे पाटील यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार

  पिंपळनेर - रिपोर्टर . बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील जेष्ठ स्वतंत्र सैनिक किसनराव नरवाडे पाटील यांचे...