Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeबीडमराठवाड्यातील गोरगरीब रूग्णांना हे शिबीर आधार ठरेल-आ.सोळंके, कालावधी संपला तरी नोंद केलेल्या...

मराठवाड्यातील गोरगरीब रूग्णांना हे शिबीर आधार ठरेल-आ.सोळंके, कालावधी संपला तरी नोंद केलेल्या रूग्णांची मोफत तपासणी करणार-आ.क्षीरसागर


बीड (रिपोर्टर):- बीडचे आ.संदिप क्षीरसागर यांच्या आयोजनातून सुरू झालेले आजचे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी मोफत तपासणी शिबीर हे गोरगरीब रूग्णांसाठी आधार ठरेल अस म्हणत आ.प्रकाश सोळंके यांनी शिबीराचे उद्घाटन केले. यावेळी आ.संदिप क्षीरसागरांनी प्रस्तावित करतांना एक महिनाभर हे शिबीर चालणार असल्याचे सांगून रोज कमीत कमी 5 ते 7 रूग्णांची तपासणी होवू शकते. महिनाभरात सव्वा दोनशेच्या आसपास रूग्ण तपासले जातील. परंतू काल एकाच दिवशी 150 पेक्षा अधिक रूग्णांची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत 250 पेक्षा जास्त रूग्णांनी नोंद केली आहे. त्यामुळे जेवढ्या नोंदी झाल्या आहेत तेवढ्या रूग्णांनी मोफत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी करणार असल्याचे आ.संदिप क्षीरसागरांनी सांगितले.

215493121 854562005176151 2671112119520228860 n


राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बीड विधानसभा मतदार संघाचे आ.संदिप क्षीरसागर यांनी काकू-नाना मेमारीयल हॉस्पिटलच्या माध्यमातून अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी मोफत शिबीराचे आज आ.प्रकाश सोळंकेंच्या हस्ते उद्घाटन झाले. मराठवाड्यातील रूग्णांसाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी माजी आ.अमरसिंह पंडित, आ.बाळासाहेब आजबे, आ.संजय दौंड, माजी आ.उषाताई दराडे, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शेख महेबुब, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.साबळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचा उद्देश प्रस्तावनातून सांगतांना आ.संदिप क्षीरसागर म्हणाले की, गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाशी सामना करत आहोत. अशा भयावह परिस्थितीत वाढदिवसाच्या निमित्ताने कुठला कार्यक्रम घ्यावा याचा विचार करत असतांना मराठवाड्यातील गोरगरीब रूग्णांसाठी अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी मोफत करावी हा विचार समोर आला आणि हा उपक्रम अजित दादांच्या वाढदिवसानिमित्त सुरू केला. जेंव्हा नावनोंदणीसाठी आवाहन करण्यात आले तेंव्हा काल एकाच दिवशी 150 रूग्णांनी नोंद केली. आत्तापर्यंत दोनशे ते अडीचशे रूग्णांनी नोंद केली आहे. सदरचे शिबीर हे एक महिनाभर चालणार असल्याचे आपण स्पष्ट केले खरे परंतू रोज किमान पाच ते सात रूग्णांच्या तपासण्या होवू शकतात. महिनाभरात 200 च्या आसपास तापसण्या होतील. मग उर्वरित रूग्णांचे काय? त्यासाठी जेवढ्या रूग्णांनी नोंदी केल्या आहेत त्या सर्व रूग्णांचे अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी करणार असल्याचे आ.संदिप क्षीरसागरांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमात माजी आ.अमरसिंह पंडित यांनी संदिप क्षीरसागरांचं कौतुक करतांना आरोग्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त कार्यक्रम संदिप क्षीरसागर काकू-नाना हॉस्पिटलच्या माध्यमातून घेत असल्याचे म्हटले. या शिबीराचे जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तर कार्यक्रमाचे उद्घाटक आ.प्रकाश सोळंके म्हणाले की, संदिप क्षीरसागरांनी घेतलेले शिबीर हे मराठवाड्यातील गोरगरीब रूग्णांसाठी आधार ठरेल. काकू-नाना हॉस्पिटलच्या माध्यमातून संदिप क्षीरसागर हे सातत्याने रूग्ण सेवा करत आले आहेत. कोव्हिडच्या काळामध्ये आ.क्षीरसागरांनी मोठे काम केले असून स्वत: ऑक्सिजनसाठी, अन्य सुविधांसाठी ते रूग्णालयात आणि रूग्णांपर्यंत गेल्याचे आपण सर्वांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!