Monday, January 24, 2022
No menu items!
Homeबीडपाटोदा उपविभागीय कार्यालयावर वंचित बहुजनचा कामाचा तुकडा पाडो दंडुके मोर्चा

पाटोदा उपविभागीय कार्यालयावर वंचित बहुजनचा कामाचा तुकडा पाडो दंडुके मोर्चा


पाटोदा (रिपोर्टर)- श्रावणबाळ योजना, गायरान जमीन, सुशिक्षित बेरोजगारांचे कर्ज प्रकरण यासह इतर मागण्यांसाठी आज बहुजन वंचित आघाडीच्या वतीने पाटोदा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाने पाटोदा शहर दणाणून गेले होते. मोर्चात अनेक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सदरील हा मोर्चा मराठवाड्याचे प्रमुख अशोक हिंगे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता.


उपविभागीय अधिकारी पाटोदा येथे कामाचा तुकडा पाडू दंडुका मोर्चा वंचित बहुजन विकास आघाडी यांच्या वतीने गायरान जमिनी कसण्यासाठी दिलेले आहेत त्यांच्या नावे शासनाने केलेल्या आहेत त्या जमिनी जाणीवपूर्वक दोन वर्षापासून तालुका प्रशासनाने पोटखराब म्हणून त्यांचे सातबार्‍यावर नोंदणी केल्यामुळे त्यांना विविध योजनांपासून वंचित राहावे लागत आहे याची दखल न घेतल्यामुळे. तालुका प्रशासनाने अंदाधुंद कारभार करून गोरगरीब जनतेचे नुकसान केले आहे जाणीवपूर्वक प्रशासनाने पोट खराब केलेल्या आहेत त्यांची झालेली नुकसानभरपाई तहसीलदार पाटोदा यांच्याकडून वसूल करण्यात लाभार्थ्यांना द्यावी. विविध मंडळाचे महामंडळाचे कर्ज प्रकरणे बँकेने ओढून त्यांची फसवणूक केलेले आहे अशा व्यवस्थापक बँक व्यवस्थापक वर गुन्हे दाखल करून सुशिक्षित बेरोजगार कर्ज तात्काळ वाटप करावे मराठा व मुस्लीम समाजास आरक्षण लागू करावे संजय गांधी श्रावणबाळ योजने अंतर्गत विनाकारण मनमर्जी ने गरीब लोकांचे प्रकरणे नामंजूर केले आहेत त्यांना लगेच मंजुरी देऊन त्यांना पाच हजार रुपये प्रति महिना द्यावा दवाखाना इतर ठिकाणी काम केलेल्या कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील कर्ज माफ झालेल्या व यादीत बसत असलेल्या शेतकर्‍यांचे कर्ज माफ करावे शेतकर्‍यांचे वीज बिल माफ करावे भूमिहीन शेतमजुरांना सन्मान योजना लागू करून त्यांना प्रति महिना पाच हजार देण्यात यावा अनेक छोटे-मोठे उद्योग व्यापारी यांना विनाकारण भाडे भरले आहे त्यांचे भाड्याची रक्कम शासनाने द्यावी पोलीस पाटलांच्या जागा त्वरित भरून कोतवाल यांना सजा वर पाठवावे विविध महामंडळाचे व सुशिक्षित बेकर यांचे कर्ज माफ करावे. बँड पथक आचारी तोफा वाजवणारे कलाकार लोहार सह व छोटे उद्योग करणार्‍या लोकांना गेल्या दोन वर्षापासून काम नाही करीत त्यांना प्रत्येकी दोन वर्षापासून प्रत्येकी दहा हजार रुपये महिना देवा करंजवण येथील वडार समाजाला स्मशानभूमीची जागा द्यावी आदी मागण्यांसाठी कार्यालय येथे मोर्चा वंचित आघाडीच्या वतीने दिनांक २२ रोजी काढण्यात आला. हा मोर्चा अशोक हिंगे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. यावेळी गोरख झेंड,बाळासाहेब गायकवाड, सुनील जावळे, बाळासाहेब जाधव, श्यामसुंदर वाघमारे, सुभाष सोनवणे, विठ्ठल पवळ, गणेश सोनवणे, शहादेव जावळे, विठ्ठल नाईकवाडे. राहुल शिरोळे, अशोक गायकवाड सह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!