Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रबीड-उस्मानाबाद रस्त्यावर अपघात; मालेगाव परिसरातील चौघे ठाऱ

बीड-उस्मानाबाद रस्त्यावर अपघात; मालेगाव परिसरातील चौघे ठाऱ

मालेगाव (रिपोर्टर):- तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी टेम्पो ट्रॅव्हलरने निघालेल्या  शहरातील तरूणांवर काळाचा घाला आला. आणि चारही जणांचा जागीच ठार झाले झाला.  बीड-उस्मानाबाद रस्त्यावर मध्यरात्रीच्या (ता.23) सुमारास ही घटना घडली.  
दिेवदर्शनासाठी निघालेल्या तरूणांचा टेम्पो ट्रॅव्हलर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभी केली होती.  याच वेळेला टेम्पोला एका आयशर ट्रकने जबर धडक दिली. आयशरच्या धडकेनंतर टेम्पो सात ते आठ फुट खोल खाली गेला. तर आयशर उलटला. यात टेम्पोसमोर बसलेले चौघे तरुण जागीच ठार झाले. या अपघातात शरद देवरे (वडगाव), जगदीश दरेकर, सतीष सुर्यवंशी (दोघे रा. दरेगाव) व विलास बच्छाव (सायने) हे चौघे  जागीच ठार झाले. सर्व तरुण 40 ते 45 वयोगटातील व्यावसायिक होते. कुटुंबातील कर्त्या तरुणांच्या निधनामुळे शहर व परिसरावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेमुळे चाळीसगाव फाट्यावरील सर्व व्यवसायीकांनी आज स्वयंस्फूर्तीने बंद पाळला आहे. फाट्यावर आज शुकशुकाट होता. अपघाताचे वृत्त समजताच शहरातील जतीन कापडणीस, राजेंद्र पवार, सतीष गिते आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत तरूणांचे शव दुपारपर्यंत मालेगावी आणण्यात येतील.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!