Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडनरेगाचे शंभर कर्मचारी बेमुदत संपावर

नरेगाचे शंभर कर्मचारी बेमुदत संपावर

नऊ महिन्यापासून कर्मचार्‍यांना ऑर्डर दिली नाही, पगारही झाला नाही.
बीड (रिपोर्टर):- रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक पंचायत समितीमध्ये कंत्राटी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. या कर्मचार्‍यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांना नऊ महिन्यानंतरही ऑर्डर देण्यात आली नाही. विशेष म्हणजे त्यांचा आतापर्यंत पगारही झाला नाही. शासनाच्या या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ जिल्हाभरातील नरेगाचे शंभर कर्मचारी दोन दिवसांपासून बेमुदत संपावर गेले आहेत. या संपामुळे नरेगाचे कामकाज खोळंबून पडले आहे.
   गावातील मजुरांना गाव पातळीवर रोजगार मिळावा या चांगल्या उद्दिष्टाने केंद्र सरकारने रोजगार हमी योजना सुरू केलेली आहे. प्रत्येक तालुका पातळीवर विहिरी, तलाव, रस्ते यासह इतर कामे नरेगातून केली जातात. गेल्या काही महिन्यापुर्वी नरेगा अंतर्गत कंत्राटी तत्वावर कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचार्‍यांची नियुक्ती करूनही त्यांना ऑर्डर देण्यात आली नाही. ऑर्डरविना हे कर्मचारी आजपर्यंत काम करत आले. विशेष बाब म्हणजे नऊ महिन्यापासून यांना पगारही देण्यात आलेला नाही. प्रशासनाचा अनागोंदी कारभार पाहता आणि पगार व ऑर्डर तात्काळ द्याव्यात यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाभरातील शंभर इंजिनिअर, ऑपरेटर, सहायक, कार्यक्रम अधिकारी हे बेमुदत संपावर गेले आहेत. कर्मचार्‍यांच्या या संपामुळे नरेगाचे काम खोळंबून पडले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!