Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडगुरुंचे स्मरण संकटांचा सामना करण्याचे धैर्य देते आ.संदीप क्षीरसागर काका-नानांच्या समाधीशी नतमस्तक

गुरुंचे स्मरण संकटांचा सामना करण्याचे धैर्य देते आ.संदीप क्षीरसागर काका-नानांच्या समाधीशी नतमस्तक


बीड (रिपोर्टर):- गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आ. संदीप क्षीरसागर यांनी आज काकु-नानांच्या समाधीस्थळी जात नतमस्तक होत स्मृतीस वंदन केले.  गुरुचे स्मरण हे आपल्या संकटांचा सामना करण्याचे धैर्य देते, असे सांगत आपले राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गुरूह े काकू-नाना असल्याचे सोशल मीडिया मार्फत त्यांनी स्पष्ट करत काकु-नानांचे आज त्यांनी आशीर्वाद घेतले.
   गुरू हे आपल्या आयुष्याला योग्य मार्ग दाखवत पदोपदी विविध रुपाने आपल्या पाठिशी उभे असतात. त्यांचे केवळ स्मरणही आपल्या संकटांचा सामना करण्याचे धैर्य ते देतात. लहानपणापासून ते आज माझ्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कामासाठी गुरुस्थानी असणारे व्यक्तिमत्व स्व. केशरकाकु क्षीरसागर व सोनाजीराव क्षीरसागर हे असून आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने स्व. काकु व नानांच्या समाधीस्थळी जावून त्यांच्या स्मृतीस वंदन केले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. अशा आशयाची पोस्ट आ. संदीप क्षीरसागर यांनी केली. राजकीय जीवनात आणि समाजकारण करताना आपण काकु-नानांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवतो. असंही त्यांनी म्हटलं.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!