Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रराज्यात पावसाचा हाहाकार, मुंबईमध्ये दुमजली इमारत कोसळली, 4 ठार

राज्यात पावसाचा हाहाकार, मुंबईमध्ये दुमजली इमारत कोसळली, 4 ठार

; सातारा-पाटण तालुक्यात दरड कोसळल्याने 4 घरे ढिगार्‍याखाली दबली, 17 जणांचा शोध सुरू
मुंबई/सांगली/सातारा/कोल्हापूर (रिपोर्टर):- राज्यातल्या अनेक भागात पावसाने गेल्या दोन दिवसांपासून हाहाकार माजवून सोडला असून मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, पाटण आदी भागात पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहे तर काही ठिकाणी इमारत कोसळल्या आहेत. मुंबईतील गोवंडी भागात इमारत कोसळून चौघा जणांचा मृत्यू झाला. तर सातारा, पाटण तालुक्यात दरड कोसळल्याने ढिगार्‍याखाली चार घरे दबली असून चौदा जणांचा शोध सुरू आहे.
   मुंबईतील गोवंडी भागात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत चौघा जणांचा मृत्यू झाला तर दहा जण जखमी झाले. सदरची घटना ही आज पहाटे  घडली. अहिल्याबाई होळकर मार्गाला लागून असलेले हे दुमजली घर कोसळले. शिवाजीनगर गोवंडी परिसरात 1 प्लस वन 1 स्ट्रक्चर असलेली इमारत पहाटे पाच वाजता कोसळली आहे. अग्निशामक दलाचे जवान बचाव कार्य करत असून आतापर्यंत चौघा जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर तिकडे सातारा-पाटण तालुक्यात पावसाने मोठा हाहाकार उडवून दिला आहे. माजवला, रायगड, चिपळुण, महाड आदी ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झाल्याने शेकडो नागरिक पुरात अडकले आहेत. काही भागात दरड कोसळल्याने मार्ग बंद झाले आहेत. प्रशासनाकडून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून रायगडमध्ये बचावासाठी हेलिकॉप्टर दाखल झाले आहेत. पोलादपूर, सुतारवाडी परिसरात दरड कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाल्याचे पोलीस कंट्रोल रुमकडून देण्यात येत आहे. चिपळुण जवळील मिरजुळी येथे 56 नागरिकांची पुरातून सुटका करण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. खेड तालुक्यातील घरांवर दरड कोसळल्याने 17 जण ढिगार्‍याखाली अडकले आहेत. सातारा-महाबळेश्‍वरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून कोयना व धोम धरणातून 50 हजारपेक्षा जास्त क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. पुर परिस्थिती गंभीर होत चालल्याने नेवीला या भागात पाचारण करण्यात आले आहे.

जिल्ह्यात रिमझीम पाऊस
राज्यभरात मुसळधार पावसाने उच्छाद् मांडला असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यात मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणासह रिमझीम पाऊस पडत आहे. अद्याप बीड जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा जैसे थे असून बीड जिल्ह्यातील नागरिक मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!