Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत...

शुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरवबीड (रिपोर्टर):- दोन वर्षांपासून कोरोनाने अवघ्या जगाला आपल्या विळख्यात घेतल्याने जनमाणसांना घरबंद राहावे लागले. उद्योग-धंदे बंद पडले, हातचा रोजगार गेला. त्यामुळे कित्येक गोरगरिब कुटुंब उघड्यावर आले. कोरोनामुळे एकीकडे कोणी जवळ येत नसताना दुसरीकडे अशा गोरगरिब कुटुंबियांना आर्थिक मदतीसह अन्न-धान्य घरपोच देणार्‍या बीडच्या तरण्याताठ्या नगरसेवकाचा दणका थेट लंडनमध्ये वाजत आहे. ‘राजयोग’ फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा बीड न.प.चे तरुण नगरसेवक शुभम धूत यांनी कोरोना महामारीत केलेल्या कार्याची दखल लंडनमधील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने घेऊन काल त्यांना सन्मानित केले.

२०१९ मध्ये कोरोनाची लाट आली. या लाटेपेक्षा भीतीची लाट अधिक होती. उद्योग धंदे बंद पडले होते. लोकांना रोजगार नव्हता, हातावर पोट असणार्‍या सर्वसामान्य कष्टकर्‍यांची आणि गोरगरिबांची ससेहोलपट होत होती. परिस्थिती गंभीर असताना या तरण्याताठ्या नगरसेवकाने आपल्या जीवाची परवा केली नाही. लोक उपाशी राहू नयेत म्हणून बीडसह जिल्ह्यातील अनेक गावात मदतीचा हात घेऊन हा तरुण गावागावात नव्हे तर गावोगावच्या गोरगरिबांच्या घरापर्यंत जावून पोहचला. तेथील गोरगरिबांना राशन दिले, किराणा दिला, त्यांना आधार दिला. एवढेच नव्हे तर रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या कोरोनाबाधीत रुग्णांना धीर देत त्यांया कुटुंबियांनाही धीर देण्याचे काम केले. दोन वर्षांच्या कालखंडात शेकडो नव्हे तर हजारो गोरगरिब कुटुंबियांना मदतीचा हात देणारा शुभम धूत हा तरुण अवघ्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला. अनेकानंी कौतुक केले, शुभ आशिर्वाद दिले. हे सर्व शुभमने राजयोग फाऊंडेशनच्या माध्यमातून काम केले. या दोन वर्षांच्या कालखंडात रक्तदान शिबिरे घेतले. स्वत: तीन वेळेस रक्तदान केले. त्याच्या या कार्याची दखल सातासमुद्र पार लंडनमध्ये घेरण्यात आली.
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन तर्फे जगभरातील १०० देशांमध्ये ग्लोबल प्लेज कॅपेन हा उपक्रम सुरू आहे, ज्या अंतर्गत कोरोना काळात प्रभावी, आणि सर्वोउत्कृष्ठ, कारागिरी बजावणारे राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या सन्मान जागतिक स्थरावर केला जात आहे, या मधे मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री आदिती तटकरे, आ.निलेश लंके, खा.डॉ.श्रिकांत शिंदे, आ.झिशान सिद्धिकी, मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह इतर राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे.

नगरसेवक शुभम धुत यांचे प्रमुख कार्य ज्याची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे त्यामधे सुरुवातीच्या लॉकडाउनमधे सर्वत्र भितीदायक वातावरण असताना जेव्हा कोणीही घराबाहेर पडत नव्हते अशा संकटकाळात बीड शहरासह ग्रामीण भागात सतत ५० दिवस राजयोग फाउंडेशन च्या माध्यमातून स्वत: अन्नधान्य व किराणा साहित्य वाटप, कोरोना च्या दुसर्‍या लाटेत सर्व सामान्य नागरिकांना कोरोना वॉर्डात जाऊन आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याबरोबरच, या २ दोन वर्षांत राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा असताना अत्यावश्यक रुग्णांना ३ वेळा स्वत: ‘ओ’ निगेटिव्ह रक्त दिले, त्याचबरोबर गरजू कुटुंबांना दिवाळी व ईद साजरी करण्यासाठी आवश्यक साहित्य वाटप केल्याबद्दल त्यांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन च्या वतीने गौरव करण्यात आला.

हा सन्मान माझा एकट्याचा नसुन बीड शहराचा, बीड जिल्ह्याचा व त्याचबरोबर माझे आई-वडील, सर्व मित्रपरिवार व कुटुंबासह लॉकडाउन काळात मला मार्गदर्शन करणार्या प्रत्येकाचा आहे. सर्वांच्या शुभेच्छा व मार्गदर्शन कायम असावे. मी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन च्या टिम चे यानिमित्त मन:पूर्वक आभार मानतो.

Most Popular

error: Content is protected !!