Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeक्राईमकोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन जण पकडले, परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई

कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन जण पकडले, परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई

परळी (रिपोर्टर):- परळी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमधील पाहिजे असलेले आरोपी परळी ग्रामीण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांनी दिनांक २३ जुलै २०२१ रात्री कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी करून पाहिजे असलेले तीन आरोपींना अटक करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे
ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर असे की गेल्या अनेक महिन्या पासून पोलीस स्टेशन अंतर्गत पाहिजे /फरारी यादीतील गुरंनं ३५/१९ कलम ६५ ई मुं.दा.का.गुरन. १२०/२० कलम ६५ एफ,ई मुं. दा.का. मधील आरोपी नामे परमेश्वर उर्फ प्रवीण बाबू पवार वय ३० वर्षे रा. धारावती तांडा तसेच २. गु.रनं १४१/२० कलम १४७, १४७, १४९, ३२६, ३२३, ५०४, ५०६ भा द वि मधील आरोपी नामे आत्माराम विठ्ठल दराडे वय ३९ ,रत्नेश्वर दत्तात्रय दराडे वय २२ रा. संगम ता. परळी असे एकुण ०३ आरोपी यांना परळी ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन घेऊन अटक केली आहे. सदरची कामगिरी परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाणे, नामदेव चाटे ,हरिदास गीते, शिवाजी गोपाळघरे, पांडुरंग श्रीमंगले ,विष्णू घुगे, पंडित पांचाळ व इतर पोलीस कर्मचारी व होमगार्ड महिला पोलीस कर्मचारी वनिता गजपाळ व नेहा करवंदे यांनी कार्यवाही केली आहे

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!