Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeक्राईमआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक

आष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक


बीड/आष्टी (रिपोर्टर):- आमदार सुरेश धस यांच्या विरोधात मुर्शदपूर गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणारे मनोज चौधरी यांच्या पांढरी येथील बीड हायवे लगत असलेल्या जमीनीतील कंपाऊंड वॉलसह हॉटेल बांधकामाची तोडफोड केल्या प्रकरणी आणि चौधरी कुुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक केल्या प्रकरणी आ. सुरेश धस यांच्यासह ३८ जणांविरोधात आष्टी पोलिसात माधुरी चौधरी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धसांसह त्यांच्या समर्थकांनी घटनास्थळी तोडफोड करत १५ लाख रुपयांचे नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत अधिक असे की, सदाशिव चौधरी यांच्या नावे असलेली जमीन पांढरी येथे बीड-नगर हायवे लगत असून या जमीनीवर कंपाऊंडसह बांधकाम आहे. सदरचे कंपाऊंड आणि बांधकाम आ. सुरेश धस व त्यांच्या साथीदारांनी जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केल्याची फिर्याद माधुरी चौधरी यांनी दिली. फिर्यादीत त्यांनी पुढे म्हटले, ‘जेव्हा धस आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी बांधकाम पाडत होते तेव्हा आम्ही कुटुंबासह घटनास्थळी गेलो, मात्र त्याठिकाणी आमची गाडी येताच गाडीवर दगडाने हल्ला करण्यास सुरुवात केली. उपस्थित लोकांच्या हातात काठ्या, कुर्‍हाडी, तलवारी असे घातक शस्त्र असल्याने आणि दगडफेक असल्याने आम्ही घटनास्थळावरून थेट पोलीस स्टेशनकडे निघालो. आमच्या गाडीचा पाठलाग करत सुरेश धसांनी दोन वेळा गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. सदरचा हा गंभीर प्रकार आ. सुरेश धस हे केवळ मुर्शदपूरची जिल्हा परिषद निवडणूक सुरेश धसां-विरोधात माझ्या पतीने लढवली तेव्हापासून ते आम्हाला त्रास देत असल्याचे माधुरी चौधरी यांनी तक्रारीत म्हटले आहे. ज्या दिवशी सदरचा प्रकार झाला त्या दिवशी कंपाऊंड वॉलसह बांधकामाची पडझड करून तब्बल १५ लाख रुपयांचे नुकसान केल्याचेही तक्रारीत म्हटले असून चौधरी यांच्या तक्रारीवरून आ.सुरेश धस, सुधीर पठाडे, रमेश वांढरे, रविंद्र पठाडे, भुषण पठाडे, नितीन पांढरे, विलास भोगाडे, संभाजी भोगाडे, भरत वांढरे यांच्यासह ३८ जणांविरोधात कलम १४३, १४७, १४८, १४९, ४२७, ३३६, ३७९ भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार हा १९ जुलै रोजी ६ ते ६.३० वाजण्याच्या सुमारास घडला.

Most Popular

error: Content is protected !!