Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeकोरोनाआजच्या अहवालात २०८ पॉझिटिव्ह बीड, आष्टी तालुक्यात सर्वाधिक बाधित

आजच्या अहवालात २०८ पॉझिटिव्ह बीड, आष्टी तालुक्यात सर्वाधिक बाधित


बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या रोज कमी-जास्त होत आहे. आज आलेल्या अहवालात तब्बल २०८ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. काल १७६ रुग्ण होते.


आरोग्य विभागाला आज ४ हजार ५१३ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये ४ हजार ३०५ जण निगेटिव्ह आढळून आले आहे तर २०८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ३, आष्टी ३७, बीड ५५, धारूर ८, गेवराई १३, केज २३, माजलगाव ७, पाटोदा २७, शिरूर ३७ आणि वडवणी तालुक्यात ८ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कालचा आकडा २०० च्या आत असला तरी आज पुन्हा २०० च्यावर रुग्णसंख्या गेली आहे. आष्टी तालुक्यात संसर्ग वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. बीड तालुक्यातही पुन्हा संसर्ग वाढू लागला आहे. नागरिक कोरोनाचे नियम पाळत नसल्यानेच रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

Most Popular

error: Content is protected !!