Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडपुरग्रस्तांना मदत करा ‘जमियत’चे आवाहन

पुरग्रस्तांना मदत करा ‘जमियत’चे आवाहन


बीड (रिपोर्टर):- राज्यातील सांगली, चिपळुण, राजेवाडी, रत्नागिगरीसह आदी भागांमध्ये मुसळधार पाऊस पडल्याने त्या ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झाली. त्यात अनेकजण मरण पावले. घरे उद्ध्वस्त झाली. अशा परिस्थितीमध्ये पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जमियत उलमाये हिंद बीड जिल्हाच्या वतीने करण्यात आले आहे.
   पुरग्रस्तांसाठी गहु, तांदुळ, डाळ यासह इतर मदत करण्यात यावी, ज्यांना मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी हाफिज जाकेर सिद्दीकी, मौलाना बाखी, मौलाना हादी, मौलाना सलीम अशरफी, हाफीज इरफान, हाफीज जमील यांच्यासह आदींनी केले आहे.
दरम्यान मदतीसाठी ‘जमियत’च्या पदाधिकार्‍यांनी शासकीय विश्रामगृहावर बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. पुरग्रस्तांसाठी जास्तीत जास्त मदत करण्याचे आवाहन बैठकीतून करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!