मृतदेह छिन्नविछिन्न
आज सकाळी
घडली दुर्दैवी घटना
घटनास्थळी
पोलीस दाखल
बीड (रिपोर्टर) बांध पेटवत असताना बांधावर ठेवलेल्या जिलेटीनचा भीषण स्फोट झाल्याने यामध्ये 67 वर्षीय शेतकरी जागीच ठार झाल्यची दुर्दैवी घटना आज सकाळी राक्षसभुवन येथे घडली. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, शेतकर्याचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता. त्या मृतदेहाचे विखुरलेले तुकडे घटनास्थळावर एकत्रित करण्यात आल्याचे सांगण्यात येते. शवविच्छेदनाला घटनास्थळीच डॉक्टराला बोलवण्यात आल्याचे समजते. घटनास्थळी पिंपळनेर पोलीस दाखल झाले होते.
राक्षसभुवन येथील आप्पासाहेब सोपानराव मस्के यांच्या विहिरीचे खोदकाम सुरू आहे. खोदकाम करण्यासाठी जिलेटीनचा वापर केला जातो. आज सकाळी आप्पासाहेब मस्के हे शेतामध्ये बांध पेटवण्यासाठी गेले होते. याच बांधावर विहीर खोदणार्यांनी जिलेटीनच्या कांड्या ठेवल्या होत्या. आप्पासाहेब यांना या कांड्यांबाबात माहिती नव्हती. त्यांनी बांध पेटवल्याने काही क्षणात या जिलेटीनचा भीषण स्फोट होऊन त्यात आप्पासाहेब जागीच ठार झाले. त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला. सदरील स्फोटाची माहिती गावकर्यांना झाल्यानंतर अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मृतदेहाचे विखुरलेले तुकडे एकत्रित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरला या ठिकाणी बोलवण्यात आले होते. पिंपळनेर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणाच्या तपासासाठी इन्वेस्टींग व्हॅन आणि फॉरेन्सिक टीम बोलवण्यात आली होती.