Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडआरोग्य कर्मचार्‍यांचे कार्यालयासमोर धरणे आंदोलन

आरोग्य कर्मचार्‍यांचे कार्यालयासमोर धरणे आंदोलन

बीड (रिपोर्टर):- आरोग्य विभागातील अंशकालीन परिचारिकांना वेतन देण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी आज आरोग्य कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे. सदरील हे आंदोलन कॉ. नामदेव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. या आंदोलनात जिल्हाभरातील महिला अंशकालीन कर्मचारी सहभागी झालेल्या आहेत.
   प्रत्येक अंशकालीन स्त्री परिचारकांना 18 हजार रुपये वेतन देण्यात यावे, स्त्री परिचारिकांना जिल्हा परिषदेच्या सेवेत कायम करण्यात यावे, नियत वयोमान झालेल्या किंवा मृत्यू पावलेल्या परिचरांच्या वारसांना रिक्त जागेवर नियुक्ती देण्यात यावी, त्यांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी महिला कर्मचार्‍यांचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. या वेळी कॉ. नामदेव चव्हाण, प्रियंका सानप, मनिषा सोनसळे, हमिदा शेख, सारिका परदेशी यांच्यासह आदींची उपस्थिती आहे

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!