Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडआडगावमध्ये वाळुचा मोठ्या प्रमाणात साठा सिंदफणाच्या पात्रातून अवैध वाळुचा उपसा सुरुच

आडगावमध्ये वाळुचा मोठ्या प्रमाणात साठा सिंदफणाच्या पात्रातून अवैध वाळुचा उपसा सुरुच

; महसूल, पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद
बीड/कुक्कडगाव (रिपोर्टर):- गोदावरी आणि सिंदफणा नदीच्या पात्रातून अवैध वाळुचा उपसा सुरुच आहे. वाळु माफिया रात्री-अपरात्री वाळुचा उपसा करून ही वाळु चढ्या भावाने विक्री करतात. बीड तालुक्यातील आडगाव शिवारात मोठ्या प्रमाणात वाळुचा साठा करून ठेवलेला आहे. या वाळु साठ्याकडे महसुल आणि पोलीस प्रशासन का दुर्लक्ष करतात? प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे.
   गेल्या काही महिन्यापासून अवैधरित्या वाळु उपसणार्‍यांचा सुळसुळाट सुरू आहे. महसुल विभागाने काही प्रमाणात कारवाया केल्या असल्या तरी संबंधितांविरोधात कठोर कारवाई होत नसल्याने वाळुचा अवैध उपसा थांबत नाही. गोदावरी आणि सिंदफणा नदीच्या पात्रातून आजही शेकडो ब्रास वाळुचा उपसा करून सदरील वाळु चढ्या भावाने विक्री केली जाते. बीड तालुक्यातील आडगाव या ठिकाणी वाळुचा मोठ्या प्रमाणात साठा करून संबंधित वाळु माफिया वाळुची विक्री करत आहेत. सिंदफणा नदीच्या पात्रातून वाळु उपसून ती एकत्रितपणे जमा करण्यात आली आहे. हा वाळुचा साठा महसुल आणि पोलीस प्रशासनाला दिसत नाही का? प्रशासनाची यात संशयास्पद भूमिका असल्याचे दिसून येत आहे

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!