वडवणी (रिपोर्टर) तालुक्यातील काडीवडगाव येथे डेंगू साथीच्या रोगाने वाटचाल सुरू केली असून अद्याप पर्यंत तीन रुग्ण सापडले आहेत. सध्या रुग्ण खाजगी दवाखान्यात उपचार घेत असून आरोग्य विभागाकडून कालच गावची पाहणी करून ग्रामस्थांना मार्गदर्शक सूचना देखील केल्या आहेत. रुग्णामध्ये लक्षणे आढळल्यास तात्काळ तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा असे आव्हान देखील काडीवडगाव ग्रामपंचायत कार्यालयासह आरोग्य विभागाने केले आहे.
वडवणी तालुक्यातील काडीवडगांव येथे डेंग्यू साथीच्या आजाराने डोकेवर काढले आहे.गेल्या पाच सहा दिवसात तीन रुग्ण सापडले आहेत.यामध्ये 60 वर्षीय पुरुष व (पान 7वर)13 व 12 वर्षीय बालकांचा समावेश आहे. तर या रुग्णाची परस्थिती ठणठणीत असून खाजगी डाँक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहेत.तर कालच शासनाच्या आरोग्य विभागाच्या डाँक्टर आणि कर्मचारी यांच्याकडून गांवची पाहणी केली आहे.ग्रामस्थांना आरोग्या विषयी मार्गदर्शन सूचना केल्या आहेत. घरोघरी जाऊन पाण्याची देखील पाहणी केली आहे.तर रुग्णाना ताप, सर्दी, खोकला, अशाक्तपणा जाणवत असल्यास घरगुती उपचार न घेता तातडीने डाँक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ती तपासणी करुनच उपचार घ्यावा असे आव्हान केले आहे.अशी माहिती काडीवडगांवचे उपसरपंच गोंविद बादाडे यांनी दिली आहे. तर ग्रा.प.स्तरवर देखील डांसाचा नायनाट करण्यासाठी गांवात धुर फवारनी करणे, पाणी जास्तकाळ साठवून न ठेवणे तसेच रुग्ण आढळून आल्यास तातडीने उपचारासाठी पाठवणे असे एकना अनेक कामे ग्रा.पं.वतीने करण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच गोंविद बादाडे यांनी दिली आहे.