अंबाजोगाईत पंकज कुमावत यांची कारवाई
बीड (रिपोर्टर) झन्नामन्ना जुगार सुरू असताना सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी स्वत: धाड टाकत 24 जुगार्यांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य, दारू, दुचाकी असा 12 लाख 17 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल पकडला. ही कारवाई अंबाजोगाई शहरातील गवळीपुरा भागात रात्री साडे दहा वाजता करण्यात आली.
सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी अंबाजोगाई शहरातील गवळीरापुरा येथे पाशा चौधरी व रहेमान सुलेमान हे एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार चालवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी स्वत: आपली टीम घेऊन रात्री साडे दहा वाजता त्या ठिकाणी छापा मारला. या वेळी झन्नामन्ना नावाचा जुगार खेळणारे 24 जण मिळून आले. ते पळून जात असताना पोलिसांनी त्यांना चारही बाजुने घेरले. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, दुचाकी, देशी-विदेशी दारू असा एकूण 12 लाख 17 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी राजू वंजारे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर अधिक्षक कविता नेहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, पो.उपनि. आनंद शिंदे, पो.अ. मुकुंद ढाकणे, राजू वंजारे, बालाजी दराडे, दिलीप गिते, गोविंद मुंडे, शिनगारे व अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पीएसआय चांद, मेंडके यांनी केली.