Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमसोन्याचे बिस्कीट मिळवण्याच्या नादात महिलेने अंगावरचे दागिने काढून दिले परळी येथे घडली...

सोन्याचे बिस्कीट मिळवण्याच्या नादात महिलेने अंगावरचे दागिने काढून दिले परळी येथे घडली घटना

परळी (रिपोर्टर):- आठवडी बाजारातून घराकडे निघालेल्या एका महिलेला रस्त्यामध्ये दोन सोन्याचे बिस्कीट दिसले. त्यातील एक बिस्कीट महिलेने उचलले. पाठीमागून आलेल्या एका इसमाने ते बिस्कीट मागितले. बिस्कीटाच्या बदल्यात तुमचे दागिने द्या, असे म्हटल्यानंतर या महिलेने अंगावरील सोन्याचे दागिने काढून दिले. सदरील हा प्रकार फसवेगिरीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत महिलेने तक्रार दाखल केली.


सुनिता नवनाथ गिते (वय ५०, रा. वडसावीत्रीनगर) ही महिला बाजारातून घराकडे जात असताना रस्त्यात महिलेला दोन सानेयाचे बिस्कीट दिसून आले. त्यापैकी एक बिस्कीट तिने उचलून घेतले. याच वेळी तिच्या पाठीमागून एक इसम आला व त्याने दुसरे बिस्कीट उचलले. आयसीआयसीआय बँकेच्या रस्त्यावर असताना या इसमाने महिलेचा पाठलाग करत तिला गाठले व माझे सोन्याचे बिस्कीट परत द्या, असे म्हणू लागला. या महिलेला बोलत असताना सिगारेट ओढत त्याचा धूर या महिलेकडे सोडला. या मुळे आपल्याला भुरळ आली व अंगावरील १७ ग्रॅम सोन्याचे दागिने काढून घेतल्याची तक्रार या महिलेने दिली. या प्रकरणी परळी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!