Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeकोरोनादेशातील २२ जिल्ह्यात वाढता कोरोना, केंद्रिय आरोग्य मंत्रालयाची चिंता राज्यातील बीड, सोलापूरचा...

देशातील २२ जिल्ह्यात वाढता कोरोना, केंद्रिय आरोग्य मंत्रालयाची चिंता राज्यातील बीड, सोलापूरचा यामध्ये समावेश


दिल्ली (वृत्तसेवा):- गेल्या अनेक दिवसांपासून देश कोरोनाशी लढा देत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील रुग्णांचा आकडा कमी होत असतानाच सात राज्यातील २२ जिल्ह्यात मात्र कोरोना कमी होत नसल्याने केेंद्रिय आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. या २२ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील बीड आणि सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे. काल केेंद्रिय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन याबाबतची चिंता व्यक्त करत उपाययोजन आणि लसीकरणाबाबत माहिती दिली.


केंद्रिय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने रात्री पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल, निती आयोगाचे विनोद के. पॉल हे उपस्थित होते. लव अग्रवाल यांनी देशातील कोरोना परिस्थितीचा आकडेवारीनुसार आढावा देताना देशातील २२ जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे म्हटले. याबाबत केेंद्रिय आरोग्य मंत्रालयाने आकडेवारी जाहीर करताना केरळ राज्यातील ७, मणिपूर ५, मेघालय ३, अरुणाचल प्रदेश ३, आसाम १, त्रिपुरा १ आणि महाराष्ट्रातील २ जिल्ह्यांबाबत चिंता व्यक्त केली. महाराष्ट्रातील सोलापूर आणि बीड जिल्ह्यात रुग्णवाढ होत असून या जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रतिबंधाची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. गेल्या आठवड्यात या जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून विनाकारण प्रवास करणे टाळावे, विना मास्क फिरू नये, कंटेनमेंट झोन तयार करणे यासारख्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे संबंधितांना सांगितले असल्याचे त्यांनी म्हटले.

Most Popular

error: Content is protected !!