Monday, January 24, 2022
No menu items!
Homeक्राईम१६ हजार प्रकरणे तडजोडीसाठी ठेवले वेळ आणि पैशाची बचत करण्यासाठी जास्तीत जास्त...

१६ हजार प्रकरणे तडजोडीसाठी ठेवले वेळ आणि पैशाची बचत करण्यासाठी जास्तीत जास्त खटले मिटवा -गोडबोले

जिल्ह्यात १ ऑगस्टला लोक अदालत

बीड (रिपोर्टर):- गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचा संसर्ग असल्याने दोन वर्षात राष्ट्रीय लोकअदालत झाली नाही. १ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालत होत आहे. यामध्ये १६ हजार प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली. नागरीकांनी आपले खटले मिटवण्यासाठी लोक अदालतचा फायदा घ्यावा आणि खटले मिटवून वेळ व पैशाची बचत करावी असे आवाहन जिल्हा निधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव सिद्धार्थ गोडबोले यांनी केले.
लोक अदालत संदर्भात आज जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना न्यायाधीश गोडबोले म्हणाले की, गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचा संसर्ग आहे. यामुळे लोकअदालत झाली नव्हती. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला असल्याने १ ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्यामध्ये लोक अदालत आयोजित करण्यात आलेले आहे.

यामध्ये १६ हजार खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आले. यात दिवाणी दावे, मोटार अपघात प्रकरणे, पोलीस वाहतुक शाखेची प्रकरणे, बँकांची कर्ज प्रकरणे, कौटुंबीक कलहाची प्रकरणे, भुसंपादनाची प्रकरणे, दुरध्वनी देयकाची प्रकरणे, नगर पालिका, ग्रामपंचायत, विद्युत महामंडळ, राज्य परीवहन महामंडळ इत्यादी तडजोडजन्य प्रकरणात पक्षकारामध्ये प्रकरणे मिटवण्यासाठी पुढाकार घ्यावा. आपले मिटवून घेवून वेळ आणि पैशाची बचत करावी असे आवाहन गोडबोले यांनी केले. सकाळी १० वाजता लोकअदालत सुरू होणार आहे. सदरील लोकअदालत जिल्हाप्रमुख न्यायाधीश हेमंत महाजन, वकील संघाचे अध्यक्ष ऍड.राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे.

Most Popular

error: Content is protected !!