Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडजिल्हा परिषदेमध्ये बदल्या सुरू

जिल्हा परिषदेमध्ये बदल्या सुरू


बीड (रिपोर्टर):- बीड जिल्हा परिषदेमध्ये पंचायत विभाग, सामान्य प्रशासन, बांधकाम, लेखा आणि वित्त सोबत पशूसंवर्धन विभागातील वर्ग ३ आणि ४ च्या कर्मचार्‍यांच्या बदल्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. या बदल्या समुपदेशनाने होत असल्यामुळे बदली प्रक्रियेत हेराफेरीला किंवा अधिकारी, पुढार्‍यांकडून वशिले-बाजीला लगाम लागला आहे.
काल लघुपाटबंधारे, आरोग्य आदी विभागातील वर्ग ३ आणि ४ च्या बदल्या केल्यानंतर आज सकाळी ११ वा.पासून सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या उपस्थितीमध्ये या बदली प्रक्रियेला सुरुवात झाली असून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी, सर्व विभागांचे खातेप्रमुख या वेळी उपस्थित होते. संबंधित विभागाच्या आस्थापना सांभाळणार्‍या कर्मचार्‍यांनी प्रशासकीय कारणास्तव १० टक्के आणि विनंती बदल्या ५ टक्के अशा मिळून बदली पात्र कर्मचार्‍यांची संचिका सभागृहामध्ये घेऊन उपस्थित राहिल्यानंतर जे कर्मचारी बदलीसाठी पात्र आहेत अशा कर्मचार्‍यांच्या समुपदेशनाने या बदल्या सुरू झालेल्या आहेत. विनंती बदलीलाही कमीत कमी तीन वर्षे संबंधित ठिकाणी काम केल्यानंतरच बदलीसाठी पात्र केले जाते. समुपदेशनाने या बदल्या होत असल्यामुळे ज्या ठिकाणी बदलीची जागा रिकामी आहे अशा ठिकाणी कर्मचार्‍यांची बदली केली जाते. या बदल्या समुपदेशनाने होत असल्याने पुढारी किंवा अधिकार्‍यांकडून वशिलेबाजीला लगाम लावण्यात आला आहे. बदली प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर एकूण किती कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या हे स्पष्ट होईल.

Most Popular

error: Content is protected !!