Thursday, January 20, 2022
No menu items!
HomeUncategorizedपुरग्रस्त भागात जाण्यापेक्षा तिथे मदत पोहचवा पंकजा मुंडेंची परळीत मदत फेरी

पुरग्रस्त भागात जाण्यापेक्षा तिथे मदत पोहचवा पंकजा मुंडेंची परळीत मदत फेरी


परळी | रिपोर्टर
पूरग्रस्त भागातील परिस्थिती खुप कठीण आहे, बिकट आहे, काही गावे मुख्यप्रवाहातून तुटली आहेत, त्यांना उभं करावं लागणार आहे अशा परिस्थितीत त्यांना मदत मिळणे आवश्यक आहे. सरकार मदत करत आहे. अन्य लोकही मदत करत आहेत. पुरग्रस्त भागात जावून गर्दी करण्यापेक्षा, यंत्रणेवर ताण आणण्यापेक्षा तेथील लोकांना मदत करा अस म्हणत पंकजा मुंडे यांनी आज परळीत पुरग्रस्तांसाठी मदत फेरी काढली. मी त्या ठिकाणी जाणार नाही मात्र आमची मदत त्या ठिकाणी नक्कीच पोहचत करणार असल्याचे त्यांनी म्हटले.


कोकणामध्ये महापूराचे अक्षरश: हाहाकार मांजून सोडला आहे. अनेक गावे आणि तेथील कुटुंबे उद्धवस्त झाली आहेत. तीतपर्यंत मदत पोहचणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण ती मदत फेरी काढल्याचे पंकजा मुंडेंनी सांगितले. आज परळीमध्ये पंकजा मुंडेंनी स्वत: पुरग्रस्तांसाठी मदत फेरीचा बॉक्स हातात घेवून शहरातून फेरी काढली. यावेळी माध्यमांशी बोलतांना पंकजा म्हणाल्या, आम्ही प्रत्येक संकटात मुंडे प्रतिष्ठान तर्फे मदत करत असतो. वाढदिवस हा नेत्यांचा सोहळा असतो पण त्या व्यक्तीचा सोहळा मुंडे साहेबांना मान्य नव्हता. त्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांना विनंती केली होती माझा वाढदिवस सोहळा करू नका. त्यातून कार्यकर्त्यांनी पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी फेरी काढु या अस सुचवलं. कार्यकर्त्यांचं कौतुक करत आज पंकजांनी शहरातून फेरी काढली. मी परळीची आहे, परळीची कार्यकर्ता आहे त्यामुळे इथे मी रॅली काढून पुरग्रस्तांसाठी मदत गोळा करत आहे. पुरग्रस्त भागात जाण्याऐवजी मदत तेथे गेली पाहिजे. ते अधिक फायद्याचे राहिल, आपण तेथे जाण्यापेक्षा तेथे मदत पोहचली पाहिजे. तिथली परिस्थिती खुप कठीण आहे, बिकट आहे, काही गाावे मुख्य प्रवाहातून तुटली आहेत, त्यांना उभं करावं लागेल, अशा परिस्थितीत त्यांना मदत मिळणे आवश्यक आहे. मी सध्या तरी त्या ठिकाणी जाणार नाही, मी जाण्याने गर्दी होवून यंत्रणेवर ताण नको त्यापेक्षा मी माझी मदत तेथे पाठवीन, जिथे पूरग्रस्तांना मदत हवी आहे असं म्हणत जास्तीत जास्त लोकांनी पूरग्रस्तांसाठी मदत पोहचत करावी असेही पंकजांनी यावेळी म्हटले. या मदत फेरीमध्ये भाजपाचे अध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!