Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडजि.प.प्रशासनात खांदेपालट दोन विभागात बदलीपात्र एकही कर्मचारी नाही

जि.प.प्रशासनात खांदेपालट दोन विभागात बदलीपात्र एकही कर्मचारी नाही


बीड (रिपोर्टर):- सलग दोन दिवस जिल्हा परिषद प्रशासनाच्या वर्ग ३ आणि वर्ग ४ कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय आणि विनंती बदल्या करण्यात आल्या. या बदल्या समुपदेशन असल्यामुळे पुढारी आणि अधिकार्‍यांना वशीलेबाजी करता आली नाही. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा आणि महिला आणि बालकल्याण विभागामध्ये बदलीपात्र एकही कर्मचारी नसल्याने या विभागातील एकही बदली झालेली नाही. इतर विभागातील जवळपास १०० च्या वर बदल्या करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने ग्रामसेवकांची संख्या मोठी होती.
प्रत्येकवर्षी ३१ मे ला या बदल्या करण्यात येत असतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या अनुषंगाने ही बदली प्रक्रिया दि.२७ आणि २८ जुलैला राज्य सरकारच्या निर्देशानुसार पार पाडली. यामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभागामध्ये प्रशासकीय आणि विनंतंी एकही बदलीपात्र कर्मचारी नसल्याने या ठिकाणी एकही बदली झालेली नाही. त्यासोबतच महिला आणि बालकल्याण विभागात एकही बदली करण्यात आलेली नाही. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या जवळपास ८ ते १० विभागातील विनंती आणि प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या केडरमध्ये सर्वात मोठे केडर असलेले पंचायत विभागातील ५८ ग्रामसेवकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या तर विनंती बदल्याही सात ते आठ करण्यात आल्या. लघु पाटबंधारे विभागात १ प्रशासकीय आणि १ विनंती बदली करण्यात आली तर कृषी आणि पशुसंवर्धन विभागातील विनंती बदल्या चार आणि कृषी मधील विनंती बदली १ करण्यात आली. आरोग्य विभागातही चार विनंती बदल्या करण्यात आल्या तर बांधकाम विभागातील १ बदलीही विनंतीने करण्यात आली. शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी यांचीही एक बदलीही विनंतीने करण्यात आली. पंचायत विभागानंतर सामान्य प्रशासन विभागातील आठ बदल्या या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्या तर विनंतीने ११ बदल्या करण्यात आल्या आणि आपसातील २ कर्मचार्‍यांच्या बदल्या या करण्यात आलेल्या आहेत. या सर्व कर्मचार्‍यांच्या बदल्या जिल्हा परिषदेमधून वेगवेगळ्या पंचायत समित्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. समुपदेशनही बदल्या करण्यात येत असल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्यकार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांची मात्र डोके दु:खी झालेली नाही.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!