Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeक्राईममाहेरी आलेल्या विवाहितेला मारहाण

माहेरी आलेल्या विवाहितेला मारहाण


बीड (रिपोर्टर):- माहेरी आलेल्या विवाहितेला पतीने मारहाण करून शिवीगाळ करत माझे दागिने दे असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून आरोपी पती विरोधात गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
विवाहिता मनिषा सिध्देश्‍वर पौळ रा.पौळाची वाडी ह.मु.कुंभारवाडी यांनी गेवराई पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तिचा पती सिध्देश्‍वर महादेव पौळ रा.पौळाचीवाडी याने ती माहेरी कुंभारवाडी येथे असताना घरी येवून तिला लाथाबुक्याने मारहाण केली. शिवीगाळ करून माझे दागिने दे असे म्हणत कानातले झुंबर वरबाडून घेतले व जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मनिषा पौळ यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात कलम ३२३, ५०४, ५०६ भादवि गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!