Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडकामधेनू डेअरीचे शिवाजी महाराजांच्या हस्ते उद्घाटन गिरगाईच्या दुधाचे मिळणार सर्व पदार्थ

कामधेनू डेअरीचे शिवाजी महाराजांच्या हस्ते उद्घाटन गिरगाईच्या दुधाचे मिळणार सर्व पदार्थ


बीड (रिपोर्टर): अध्यात्मिक क्षेत्रासह आयुर्वेदामध्ये गायीला अनन्य साधारण महत्त्व असून गिरगाईच्या दुधासह अन्य उत्पादन सर्वसामान्यांना योग्य भावात मिळावेत यासाठी गो प्रचार मोतीराम गाडे यांनी कामधेनू डेरी स्थापन केली असून त्याचे उद्घाटन आज ह.भ.प. शिवाजी महाराज, महंत श्रीक्षेत्र नारायणगड यांच्या हस्ते करण्यात आले. या डेरीमध्ये गिरगाईच्या दुधापासून बनवलेले उत्पादने मिळणार आहेत.


उद्योग क्षेत्रात नाव कमवलेले मोतीरामजी गाडे यांनी बीड जिल्ह्यात गिरगाईचे पालन करण्यास सुरूवात केली आहे. त्यामार्फत गिरगाईचे दुध दुधाचे वेगवेगळे पदार्थ सर्वसामान्यांना योग्य भावात मिळावेत यासाठी त्यांनी कामधेनू डेरी स्थापन केली आहे. त्याचे उद्घाटन आज नारायणगडाचे मठाधिपती ह.भ.प. श्री शिवाजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. अंबिका चौकातील गव्हाणे बिल्डींगमध्ये हे सर्व उत्पादने मिळणार आहेत. अध्यात्मिक क्षेत्रासह आयुर्वेदामध्ये गायीला आणि तिच्यापासून मिळणार्‍या अन्य गोमूत्रासह दुधाला सर्वत्र अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे या डेरीमध्ये आता गिरगाईचे दुध, तूप, दही, पणीर, मंजन, गोमूत्र, अर्क, धुपबत्ती, साबन, बाम, अमृतधारा यासह लाकडी घाण्याचे तेल नैसर्गिक धान्य मिळणार आहे. या कार्यक्रमाला भारत मते यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!