Monday, January 24, 2022
No menu items!
Homeबीडचोरीच्या नऊ दुचाकी जप्त स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई

चोरीच्या नऊ दुचाकी जप्त स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई

बीड (रिपोर्टर) दुचाकी चोरणार्‍या टोळीचा गेल्या काही दिवसापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला होता. यावेळी सहा आरोपीच्या मुसक्या आवळत ३१ दुचाकी जप्त केल्या होत्या. पून्हा एलसीबीने दुसरी कारवाई केली असून नऊ दुचाकीसह काही आरोपी ताब्यात घेतले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरूर तालुक्यात दुचाकी चोरणार्‍याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अमोल रोहिदास झेंडे रा.नांदेली ता.शिरूर याच्याकडील चोरीची मोटारसायकल असल्याची माहिती होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडील मोटारसायकलबाबत विचारपूस केली असता त्याने त्याचा चुलत मेव्हणा राजु साळवे रा.पैठण याच्याकडून ती घेतल्याचे सांगितले. आणखी दोन मोटारसायकल घेतल्या आहे असे सांगितल्याने त्या त्याच्याकडून तीन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. त्यामधील एका मोटारसायकलचा एमआयडीसी पैठण येथे गुन्हा दाखल आहे. तर पांचाळेश्‍वर ता.गेवराई येथे सुध्दा त्याच्या नातेवाईकांकडे राजु साळवे याने गाड्या दिल्या असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी लक्ष्मण रखमाजी उन्हाळे, भारत मारूती झेंडे, प्रविण आप्पासाहेब यांच्याकडून प्रत्येक दोन मोटारसायकल अशा सहा मोटारसायकल जप्त केल्या. यातील सहा मोटारसायकलसह आरोपींना चकलांबा पोलिस ठाण्यात आणि तीन मोटारसायकल व एक आरोपीला बीड ग्रामीण पोलिसांकडे पुढील कारवाईसाठी स्वाधीन केले.

Most Popular

error: Content is protected !!