Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमपोखरी फाट्यावर अपघात;एक जागीच ठार

पोखरी फाट्यावर अपघात;एक जागीच ठार


वडवणी (रिपोर्टर):- पोखरी फाट्यावरुन वडवणीकडे पायी येत असलेल्या इसमाला चारचाकी कारनेने जोराची धडक दिली असून यात इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे.हि घटना काल रात्री सात वाजण्याच्या सुमारास बीड-परळी रोडवरील पोखरी फाट्यावर घडली आहे.
धारुर तालुक्यातील जाहागीर मोहा येथील रहिवाशी असणारे ह.मु.वडवणी येथील ज्ञानोबा बळीराम सिरसट अंदाजे वय-50 वर्ष हे काल दुपारी म्हतारा मसुबा या देवस्थानात कंदुरीचे जेवण करण्यासाठी गेले होते.देवस्थानातून जेवण करुन वडवणीकडे पायी येत आसताना पोखरी फाट्यावर सायं सात वाजण्याच्या सुमारास आले आसता मागून भरधाव येणाऱ्या होंडाई कंपनीची एमएच-12 सीआर-6611 या चारचाकी कारने ज्ञानोबा सिरसट यांना जोराची धडक दिली यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असून घटनास्थळी नातेवाईकांनी धाव घेतली आसता त्याआधीच त्यांची प्राणज्योत माळवली होती.त्यांचा मृतदेह बीड येथील शासकिय रुग्णालयात श्‍वविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे.तर ज्ञानोबा बळीराम सिरसट यांच्या पश्‍चात मोठा परिवार आहे.तर अपघातातील चारचाकी कार ही वडवणी तालुक्यातील कोठरबन येथील आहे.अशी माहिती नातेवाईकांकडून सांगण्यात आली आहे.

Most Popular

error: Content is protected !!