Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडनगर जिल्ह्यातून येणार्‍यांची होणार अँटीजेन चाचणी, चेकपोस्ट लावण्याचे आदेश; ना.मुंडेंनी घेतला आढावा

नगर जिल्ह्यातून येणार्‍यांची होणार अँटीजेन चाचणी, चेकपोस्ट लावण्याचे आदेश; ना.मुंडेंनी घेतला आढावा

लसीची आवक वाढवण्याची जबाबदारी माझी,तुम्ही लसीकरण वाढवा
त्या चार ऑक्सिजन प्लांटचे काम तात्काळ पुर्ण करा
आपल्याला जिल्हा
निर्बंधमुक्त करायचाय

बीड (रिपोर्टर):- आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यात बाधितांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आता नगर किंवा कोरोनाची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यातून येणार्‍या प्रत्येक व्यक्तीची अँटीजेन टेस्ट करा तेंव्हाच त्याला जिल्ह्यात प्रवेश द्या, त्यासाठी रस्त्यावर चेक पोस्ट लावा असा आदेश देत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनासह लसीकरणाचा आढावा घेतला. गेल्या चार महिन्यात कोरोना वाढत होता त्यावेळी कोरोनाला आटोक्यात आणून राज्यात नाव कमावले. आता कोरोना आटोक्यात का येत नाही? त्याला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची परिकाष्टा करा. राज्यातले अन्य जिल्हे निर्बंधमुक्त होत आहेत, आपल्यालाही निर्बंधमुक्त व्हायचं आहे त्यासाठी मरगळ झटका, लसीकरणाचा वेग वाढवा लसीची आवक वाढवण्याची जबाबदारी मी घेतो असेही ते यावेळी म्हणले.


पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक सुरू आहे. या बैठकीला आ.संदिप क्षीरसागर, आ.बाळासाहेब आजबे, प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलिस अधिक्षक राजा रामास्वामी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांच्यासह आदि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. गेल्या चार महिन्याच्या कालखंडामध्ये जेव्हा कोरोना वाढत होता तेव्हा तो आटोक्यात आणला. राज्यात नाव कमावलं आता कोरोना आटोक्यात का येत नाही? असा सवाल करत जिल्ह्यातील काही तालुक्यात वाढत चाललेला कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मरगळ झटकून प्रयत्नांची परिकाष्टा करा, राज्यातील अनेक जिल्हे निर्बंधमुक्त झाले आहेत. आपला जिल्हा निर्बंधमुक्त करण्यासाठी कोरोनाला अटकाव गरजेचा आहे. त्यासाठी उपाययोजना करा, परळीला आता दोन तीन रूग्ण आढळून येत आहेत. त्यानुसारच जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण कमी कसे होतील? यासाठी प्रयत्न करा. ज्या चार ऑक्सीजन प्लँटचे काम सुरू आहे ते लवकर पुर्ण करा. बीड जिल्हा रूग्णालयासह एसआरटी मध्ये 256 स्लाईस सिटीस्कॅन मशीनची मागणी असून याचा खरेदीचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या. कोविडची तिसरी लाट वाढू नये याचा आढावा घेत पालकमंत्र्यांनी संबंधीतांना सुचना केल्या. लसीकरणाचा आढावा घेताना लसीकरण प्रमाण वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. पालकमंत्र्यांनी कोविडच्या कार्यकाळामध्ये वेळोवेळी बैठका घेवून जिल्ह्यातील कोरोना सातत्याने आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानुषंगाने कोरोना रोखण्यासाठी ज्या जिल्ह्यामध्ये बाधितांची संख्या जास्त आहे त्या जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात येणार्‍या व्यक्तीची आता अँटीजेन टेस्ट करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेली दिल्या. त्यासाठी चेकपोस्ट उभारण्याचे आदेश यावेळी संबंधितांना देण्यात आले. आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यात बाधितांची संख्या जास्त असल्याने नगर किंवा अन्य कोरोना बाधितांची जास्त असलेल्या जिल्ह्यातून येणार्‍या नागरीकांची आता अँटीजेन टेस्ट होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!