Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडमाजलगावमुख्याधिकारी जिंकले नगराध्यक्ष हरले

मुख्याधिकारी जिंकले नगराध्यक्ष हरले


माजलगाव (रिपोर्टर):- मुख्याधिकार्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे या उद्देशाने शुक्रवारी नगराध्यक्षांनी विशेष सभा आयोजित केली होती.परंतु या सभेच्या ठरावा पूर्वीच जवळपास सर्वच नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांची बाजू घेत नगराध्यक्ष शेख मंजूर यांना एकाकी पाडले. दरम्यान नगराध्यक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या मुख्याधिकार्‍यांच्या सक्तीच्या रजेवर पडदा पडत मुख्याधिकारी या लढाईत जिंकले असून नगराध्यक्ष शेख मंजूर यांना याठिकाणी हरण्याची वेळ आली.
शुक्रवारी आयोजित विशेष सभेत नाट्यमय घडामोडी घडत मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी शासकीय नियमानुसार कोव्हीड पिरेड मध्ये ऑफलाइन सभा घेता येत नसल्याचे पत्र काढले.या वेळी जवळपास सर्वच नगरसेवकांनी आयोजित विशेष सभेत आपल्या कामकाजासंदर्भात घेण्यात आलेला विषय याठिकाणी वगळण्यात येणार असल्याचे मुख्याधिकार्यांना सांगितले.त्यामुळे सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येण्यासाठी नगराध्यक्षांनी आयोजित केलेली विशेष सभा याचे महत्त्व याठिकाणी संपुष्टात येऊन नगराध्यक्ष शेख मंजूर यांना झुकती बाजू घ्यावी लागली.दरम्यान नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांची मनधरणी करून नगराध्यक्ष यांच्यासोबत बैठक बसवली. झालेल्या बैठकीत सक्तिच्या रजेचा विषय सोडून नगराध्यक्ष मुख्याधिकारी यांच्या वादावर पडदा टाकण्याचा विषय यावेळी नगरसेवकांकडून घेण्यात आला असल्याची माहिती आहे.दरम्यान यावेळी नगराध्यक्ष यांनी ठरलेली अकरा वाजन्याच्या दरम्यान ची विशेष सभा पुढे ऑनलाइन स्वरूपात तीन वाजता घेण्याचे जाहीर करून आपली नामुष्की झाकण्याचा प्रयत्न केला.
चौकट
या आजच्या सभेमध्ये मराठा भवनाच्या जागेसंदर्भात ठराव घेणार आहेत. या ठरावात मराठा भवनाला 200 बाय 300 जागा न दिल्यास मी येत्या 10 तारखेला नगर पालिकेच्या नविन झालेल्या इमारतीवर सर्व मराठा युवक घेउन नगर पालिका इमारतीस मराठा भवन नाव देण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र होके पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे या मिटींगमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Most Popular

error: Content is protected !!