Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeक्राईमतेलगावच्या श्रीकृष्ण पार्कमध्ये दरोडेखोरांचा हैदोस महिलांवर चाकू हल्ले,दागिने ओरबाडले, लहान मुलांनाही सोडले...

तेलगावच्या श्रीकृष्ण पार्कमध्ये दरोडेखोरांचा हैदोस महिलांवर चाकू हल्ले,दागिने ओरबाडले, लहान मुलांनाही सोडले नाही


दागिन्यासह अडीच लाखाची रोकड पळवली; घटनेने परिसरामध्ये प्रचंड दहशत
तेलगाव (रिपोर्टर):- घरामध्ये झोपलेल्या चार महिलांवर शशस्त्र हल्ला करत त्यांच्या अंगावरील सोने लुटुन नेत घरामधील 2 लाखापेक्षा जास्त रूपयांची रोकड लुटल्याचा प्रकार तेलगावमध्ये घडला. अज्ञात चार दरोडेखोरांनी प्रतिकार करणार्‍या महिलांवर चाकू हल्ले केल्याने यात दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत तर अन्य दोघींना लाथाबुक्याने मारहाण केली आहे. सदरचा प्रकार हा तब्बल 1 तास चालू होता. या घटनेने तेलगावसह परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेची माहिती रात्री दिंद्रुड पोलीसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट दिली. आज सकाळी अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांनी भेट दिली असून दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पथक निर्माण केले आहे. श्‍वान पथकालाही पाचारन करण्यात आले आहे.
तेलगाव येथील कृष्णा पार्कमध्ये राहणारे लक्ष्मण भानुदास शिंदे यांच्या निवासस्थानी काल रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चार दरोडेखोरांनी हल्ला चढवला. यावेळी घरामध्ये दोन पाहुण्या आल्यामुळे लक्ष्मण शिंदे व त्यांचा मुलगा हा घराच्या वरच्या रूममध्ये झोपले होते तर खालच्या रूममध्ये लक्ष्मण शिंदे यांच्या पत्नी शामल शिंदे व अंबाजोगाई येथून आलेल्या त्यांच्या पाहुण्या वर्षा अशोक चव्हाण ( व38), सुनिता किरण औताडे रा.धारूर, लक्ष्मीबाई साठे रा.होळ या झोपल्या होत्या. त्यावेळी दरोडेखोरांनी दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला. ज्या ठिकाणी महिला झोपल्या होत्या त्या ठिकाणी शस्त्राचा धाक दाखवून लुट करायला सुरूवात केली. मात्र यावेळी महिलांना आरडाओरड आणि प्रतिकार करायला सुरूवात केली त्यावेळी दरोडेखोरांनी शामल शिंदे व वर्षा चव्हाण या दोघींवर चाकूने वार केले. यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. तर सुनिता औताडे व लक्ष्मीबाई साठे यांना शस्त्राचा धाक दाखवून लाथाबुक्क्याने मारहाण करत या चौघींच्या अंगावरील दागिने ओरबाडून नेले. याच वेळी त्यांच्या सोबत असलेल्या लहान मुलांच्या अंगावरील दागिने दरोडे खोरांनी हिसकावले. एवढेच नव्हे तर घरामधील 2 लाखापेक्षा जास्त रूपयांची रोकड त्यांनी चोरून नेली. दरोडे खोरांचा हा धिंगाणा तब्बल एक ते दीड तास सुरू होता. दागिन्यासह नगदी रोकड असा एकूण 4 लाखापेक्षा जास्त रूपयाचा ऐवज लुटून दरोडेखोर घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती दिंद्रुड पोलीसांना झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळाला भेट दिली. यातील जखमींना नजीकच्या रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांनी भेट दिली. श्‍वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून दरोडे खोरांचा शोध घेण्यासाठी पथक निर्माण केले आहे. या घटनेने तेलगावसह परिसरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Most Popular

error: Content is protected !!