Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईम308 पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्या एलसीबीत आठ जणांच्या बदल्या; नवीन एकालाही संधी नाही

308 पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्या एलसीबीत आठ जणांच्या बदल्या; नवीन एकालाही संधी नाही


बीड (रिपोर्टर):- पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया गेल्या दोन महिन्यापासून चर्चेचा विषय ठरला होता. अखेर काल या बदल्यांना मुर्हुत लागला मात्र यादी प्रसिद्ध झाली नव्हती. आज सकाळी पोलीस कर्मचार्‍यांची बदल्यांची यादी प्रसिद्ध झाली. यामध्ये 308 जणांचे नावे असून 42 जण प्रतिक्षा यादीत आहेत. 308 पैकी एकाही कर्मचार्‍याला स्थानिक गुन्हा शाखेत काम करण्याची संधी मिळाली नाही. तर स्थानिक गुन्हे शाखेतील आठ कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत. आता उर्वरित 42 जणांना स्थानिक गुन्हे शाखेत संधी मिळते की काय? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
पोलीस ठाण्यात कार्यकाळ संपलेल्या पोलीस कर्मचाार्‍यांच्या बदल्या गेल्या दोन महिन्यापासून रखडलेल्या होत्या. कोरोनामुळे त्या पुढे-पुढे ढकलण्यात येत होत्या. अखेर काल पोलीस अधिक्षक आर.राजा स्वामी, अप्पर पोलीस अधिकारी सुनिल लांजेवार यांनी 350 पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्यासाठी पोलीस मुख्यालय येथे मुलाखती घेतल्या होत्या. यावेळी अनेकांनी स्थानिक गुन्हे शाखा मिळावी यासाठी विनंती केली होती. मात्र एकाही कर्मचार्‍याला स्थानिक गुन्हा शाखेत संधी मिळाली नाही. त्यानंतर प्रत्येकांना 3 पर्याय देण्यात आले होते. त्या पर्यायाप्रमाणे 308 पोलीस कर्मचार्‍यांची यादी आज सकाळी प्रसिद्ध करण्यात आली आहे तर 42 पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्याची यादी केंव्हा प्रसिद्ध होणार हे सांगण्यात आले नाही.

Most Popular

error: Content is protected !!