Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडकेजविकेंड लॉकडाऊनमध्ये दुकान सुरू ठेवणार्‍या विरोधात केजमध्ये कारवाई

विकेंड लॉकडाऊनमध्ये दुकान सुरू ठेवणार्‍या विरोधात केजमध्ये कारवाई


केज (रिपोर्टर):- शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस विकेंड लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमध्येही काही दुकानदार दुकान सुरू ठेवून व्यवहार करते. आज न.प.च्या मुख्याधिकार्‍यांनी रस्त्यावर उतरून दुकान सुरू ठेवणार्‍या दुकानदाराविरोधात दंडात्मक कारवाई केली. शहरातील व्यावसायिकांनी शासनाचे नियम पाळावे नसता कारवाई केली जाईल असा इशारा मुख्याधिकारी यांनी दिला आहे.


बीड जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग अद्याप पुर्णत: कमी झाला नाही. दररोज दीडशे ते दोनशे या दरम्यान नवीन रूग्ण सापडत आहेत. कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शनिवारी, रविवार असे दोन दिवस सर्व अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आहे. असे असतांना केज शहरातील काही व्यापारी दुकाने सुरू ठेवून व्यवहार करतात. आज न.प.चे प्रभारी मुख्याधिकारी सचिन देशपांडे, आयुब पठाण, सय्यद अतिक, पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांनी शहरामध्ये फेरी मारली. यावेळी त्यांना काही दुकाने सुरू असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. व्यावसायिकांनी नियमाचे पालन करावे असे आवाहन प्रभारी मुख्याधिकारी सचिन देशपांडे यांनी केली आहे.

Most Popular

error: Content is protected !!