Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रआबासाहेबांना श्रमिकांचा लाल सलाम! अखेरचा निरोप देण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

आबासाहेबांना श्रमिकांचा लाल सलाम! अखेरचा निरोप देण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी


सोलापूर (रिपोर्टर):- शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन झाल्याने राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे. आज त्यांचे पार्थिव सांगोला तालुक्यात येणार असल्याने पंढरपूर-सांगोला रस्त्यावर त्यांच्या अखेरच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते.
आज शनिवारी सकाळी सोलापूरहून त्यांचं पार्थिव सांगोला तालुक्यात दर्शनासाठी येणार असल्याने नागरिकांची एकच गर्दी पाहायला मिळाली. इतकंच नाहीतर पंढरपूरवरून येणार्‍या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात नागरिक उभे होते. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास सांगली तालुक्यात आबासाहेबांचं पार्थिव आले असता नागरिकांनी ’आबासाहेब अमर रहे’ अशा घोषणाही दिल्या. गणपतराव देशमुख यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, काल सायंकाळी त्यांची प्रकृती अचानक ढासळली आणि रात्री ९ च्या सुमारास त्यांनी सोलापुरातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गणपतराव देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून तब्बल ११ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. सर्वाधिक वेळा विधानसभेत निवडून जाणारे आमदार म्हणून देशमुख यांची ओळख होती.

स्वच्छ प्रतिमेचा ध्येयवादी नेता आज आपण गमावला
गणपतराव यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे, अशी भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. शरद पवार म्हणाले, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल.


अजातशत्रु व्यक्तिमत्व गमाावलं-ना.मुंडे
विधानसभेत सलग अकरा वेळा निवडूण विक्रम प्रस्तापित केलेले शेकापचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री गणपतीराव देशमुख उर्फ आबा यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे. साधेपणाचे मुर्तीमंत उदाहरण देशमुख साहेब यांच्या जाण्याने जनतेशी घट्ट नाळ जोडलेला एक अजातशत्रु व्यक्तिमत्व हरपल्याचे सांगत पालकमंत्री ना.धनंजय मुंडेंनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!